Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माझं लातूर परिवाराचे मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीर

माझं लातूर परिवाराचे मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीर

पोलिस अधिक्षक सोमय मुंडे आणि  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते होणार शिबीराचे उद्घाटन





लातूर : माझं लातूर परिवार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ फेब्रुवारी २०२३ वार-सोमवार रोजी आयोजित मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते होणार आहे.

गांधी चौक येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेत्र विभागात सकाळी ९ वाजता शिबीरास सुरुवात होईल याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अधिष्ठाता डॉ समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र विभाग प्रमुख डॉ उदय मोहिते, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ श्रीधर पाठक, डॉ नंदकुमार डोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन जाधव, डॉ आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णांची तपासणी होणार आहे. मोतीबिंदू निदान झालेल्या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा नेत्र विभागात तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया पार पडतील. 

माझं लातूर परिवाराचे हे तिसरे मोफत मोतीबिंदू शिबीर असून या शिबिरासाठी तब्बल १७८ रुग्णांनी नावनोंदणी केली आहे. रुग्णांना कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी अर्ज आणि सोबत आधार कार्डची प्रत असणे आवश्यक आहे. २५ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. रुग्णांच्या मदतीसाठी शिबिराच्या ठिकाणी माझं लातूरचे ४० सदस्य उपलब्ध असतील.
Previous Post Next Post