छत्रपती शिवजयंतीनिमत्त लातूरकरांची भव्य दुचाकी रॅली मध्ये
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार राजा सिंग ठाकूर सामील
छत्रपती शिवजयंतीनिमत्त भव्य सोहळा
खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
लातूर/प्रतिनिधी ः- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमत्त रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी आपण सर्वजण लातूरकरच्या वतीने शहरातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले . या रॅलीत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार राजा सिंग ठाकूर सामील झाले
हिंदु टायगर आ. टी राजा यांचा सहभाग राहणार असून
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची परंपरा आहे. तसेच जयंतीनिमित्त प्रतिवर्षी आपण लातूरकरांच्या वतीने शहरातून भव्य दुचाकी रॅलीही काढण्यात येते. त्यानुसारच शिवजयंतीनिमत्त आपण सर्वजण लातूरकरांच्या वतीने सिद्धेश्वर देवस्थानपासून सकाळी 10 वा. भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले . शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली मार्गस्थ होणार असून
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार राजा सिंग ठाकूर हे दुचाकी रॅली मधे सहभाागी होवूून गंजगोलाई येथील जगदंबा देवीच्या मंदिरात महा आरती करून देवीचे दर्शन घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन ही करण्यात आले अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत रयतेचे राजे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, अँड. दशरथ सरवदे, अशोक सावंत, ज्ञानेश्वर जुगल, चंद्रकांत कातळे, दिलीप पाटील, लक्ष्मण खलंग्रे, सुखदेव बरडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.