Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन ला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण राठोड रुजू ....

शिरूर अनंतपाळ  पोलीस स्टेशन ला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण राठोड रुजू ....


बाबूराव बोरोळे
शिरूर अनंतपाळ/उदगीर             

शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याला कायम स्वरूपी पोलीस निरीक्षक मिळत नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सध्या जिल्हयातील आनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . यात येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांची बदली पोलीस कंन्ट्रोल रुमला करून त्यांच्या ठिकाणी शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे सहयक पोलीस निरीक्षक प्रविण मनोहर राठोड यांनी दि . ४ फेब्रुवारी रोजी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचा पदभार घेतला .
        प्रविण राठोड यांनी या पूर्वी वजीराबाद पोलीस ठाणे नांदेड येथे एल. सी .बी.ला चांगले काम केले आहे . त्या बरोबरच गोंदीया, मुंबई सारख्या महानगरात त्यांनी चांगले काम केले असल्यामुळे त्यांच्याकडे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचा पदभार दिला गेला आहे . पण शिरूर अनंतपाळ येथे गेल्या चार पाच महिन्या पूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बॅके वर दरोडा टाकून रोख रक्कम व कर्जा पोटी तारण ठेवलेले सोने असा जवळ पास ५९ लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविला त्याचा तपास अधाप लागला नाही . व तालुका परिसरात असलेल्या विविध हॉटेल व धाब्यावर खाणावळी च्या नावा खाली सुरु असलेल्या ठिकाणी बिनधास्तपणे देशी दारूची विक्री केली जाते . त्या बरोबरच शासनाने बंदी घातलेला पान मसाला व तंबाखु मिश्रीत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे . येरोळमोड येथे खुलेआम दारु विक्री व्यवसाय जोरात सुरू आहे हाटेलवर चहाचा कप महाग तर दारु स्वस्त झाली असल्याने याठिकाणी सकाळी दुपारी संध्याकाळी जञेचे स्वरूप आले आहे.दारुच्या नशेत या राज्यमार्गावर सुसाट वेगाने वहातूक वाढली असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्या अनुभवाचा या ठिकाणी फायदा होईल का ? अशी ही चर्चा नागरीकातुन होत आहे . येथे झालेल्या चोरीचा तपास यांच्या काळात लागेल अशी अपेक्षा नागरीकांची आहे . व बोकाळलेले अवैध धंदे याला लगाम घालण्यासाठी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण राठोड यांच्या समोर आव्हान आहे .
Previous Post Next Post