Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

काही मराठा आणि बहूजन ४%ब्राम्हणांच्या विरोधात..!मग सोबत कोणाच्या..? का फक्त सत्तेसाठी विरोध ..?

काही मराठा आणि बहूजन ४%ब्राम्हणांच्या विरोधात..!मग सोबत कोणाच्या..? का फक्त सत्तेसाठी विरोध ..? 


ज्यांनी छत्रपति शिवरायांना आपल्या कल्पक बुध्दि चा वापर करुन स्वराज्य घडवण्यास मदत केली.महारांजा जीव वाचवण्यासाठी जिवा महाल सरसावून पुढे येवून महाराजांवर चालून येणार्याचा हात धडावेगळा केला,शिवा काशीद ने महाराजांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून महाराजांसाठी प्राण त्याग केला,विर बाजीप्रभु देशपांडे यांनी मुठभर सैन्य ठेवून महाराज गडावर पोहचेपर्यंत गनिमाला पावन खिंडीत आडवून ठेवले या सर्वच विरांनी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीवाचा त्याग केला आशा विरांना मानाचा मुजरा..!
परंतू सध्या संपुर्ण देशात हिंदू, मुस्लिम, ब्राम्हण,बहुजन आणि मराठा या जीतीवर राजकारण चालू असून जोतो उठतो तर ब्राम्हण समाजावर गरळ ओकत असतो.एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा ब्राह्मणेतर नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर राजकीय सत्ता संपादन केली...वगैरे वगैरे अशी चर्चा करुन ब्राम्हण समाजाच्या विरोधात एक प्रकारे लाट निर्माण केली जात आहे.आत्तापर्यंत बहुजनांनवर आन्याय केल्याचा इतिहास सांगीतला जातो मग देशाचा संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते ...हे का...विसरतात ! विशेष म्हणजे त्यांनी बहुजनांना न्याय मिळावा यासाठी आयुष्य घालवले त्याच ब्राम्हण समाजाचा आज तिटकारा केला जात आहे...का? आणि कशासाठी..?काय चुकले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ते ज्या समाजाचे होते त्याच समाजाला संविधनामध्ये १ 
१%हि आरक्षण दिले नाही ....लोकांच्या घराघरात जावून भिक..मागून पोट भरणार्यांना भटुकडे म्हणुन हिनवले जात आहे....चांगले राहणे,शिक्षण असणे म्हणजे अर्थिक परिस्थिति चांगले असणे नव्हे...! .. काय चुकले छत्रपति शिवाजी महाराज यांचे बहर्जी नाईक गुप्तहेर पुन्हा होणे नाही या सारख्या  असंख्य ब्राम्हण समाजावर त्यांनी विश्वास टाकला ...आणि बारा बलुतेदारांना सोबत घेवून स्वराज्य घडवून इतिहास रचला......परंतू त्यावेळेस ना मुसलमान,ना महार,ना मराठा,ना बहुजन ...सर्व एकच होते ..मग आत्ताच का जात धर्म उफाळून येत आहे.उठ सुठ कोणीही एकाद्या समाजावर खडरपणे टिकाकरुन बोलून आपले राजकारण करणे हे नित्याचे झाले आहे. आणि आत्ताच महारााष्ट्रामध्ये सत्ता पलट झाली आणि धनुष्यबाण आणि नाव ही पळवले याचाही संबंध ब्राम्हण समाजावर लावण्यात येत आहे.परंतू सत्येसाठी काहीही करणारे राजकारणी हे कोणत्याही समाजााचे  नसतात हे
 आता सर्वसामान्य नागरिकांना  समजते परंतू युवक मात्र या जातीचा शिकार होत चालला आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आणि बहूजन ४%ब्राम्हणांच्या विरोधात..! का फक्त सत्तेसाठी विरोध .. आहे का..? असे चित्र दिसत असेल तर मग सोबत कोणाच्या या प्रश्नाचे उत्तर आजुनपर्यंत भेटले नाही...!
आजुनही काही बहुजन ब्राम्हण समाजावर टिका करत असलातरी काही आप्तेष्ट त्यांच्या लहान लहान मुलांची कुंडली तयार करुन देत आहेत,आजुनही ब्राम्हण समाजातील काही जन दर्ग्यावर चादर चढवतात ,बहुतांश माराठा समाजात तर ब्राम्हण समाज सत्य नारायण पुजा नित्याने केली जातात ....मग हे सर्वजन खुश आहेत तर बाकींच्या नाकाला का मिर्ची लागते...कारण फक्त  एकचं...राजकारण! बाबांनो मणुष्य ही एकच जात पृथ्वी वर असुन ,मणुष्य मणुष्याला मदत करणे हेच धेय्य ठेवणे समाजाच्या दृष्टीने हित कारक राहणार आहे...!
Previous Post Next Post