Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'राजकीय आर्थिक प्रसाद' घेवूनच या पोटनिवडणुका 'हाय प्रोफाईल'बनल्या

'राजकीय आर्थिक प्रसाद' घेवूनच  या पोटनिवडणुका 'हाय प्रोफाईल'बनल्या



पुणे, २४ फेब्रुवारी २०२३
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सध्या विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना असा थेट सामना होत असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहेत.पंरतु, ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विजयी होईल,असे भाकित इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.


कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने मतदार नाराज आहेत.टिळक कुटुंबियांवर झालेला राजकीय अन्यायामुळे या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचे पारडे जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे जेष्ठ मंत्री ठान मांडून आहेत.अशात भाजप-शिवसेना युतीला काही चमत्कार घडवता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर चिंचवड मध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.
जगताप यांच्या पाठीशी सहानुभूतिची लाट आहे.पंरतु,या दोन्ही जागा विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्याने महाविकास आघाडीने त्यावर उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करणे आवश्यक होते.पंरतु,राज्याची राजकीय परंपरा त्यांनी पाळली नाही. निवडणुकीमुळे सर्व नेतेमंडळी पुण्यात ठाण मांडून आहेत. पंरतु, मतदार सर्वच पक्षांना कंटाळले आहेत. 'राजकीय आर्थिक प्रसाद' घेवूनच बाहेरची मंडळी काम करीत आहे.पैसे वाटून सभेला गर्दी करण्यासाठी लोकांना एकत्रित केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पैशांच्या बळावर या पोटनिवडणुका 'हाय प्रोफाईल'बनल्या आहेत, असा दावा पाटील यांनी केला.
Previous Post Next Post