केज मतदारसंघातील भाजपातील गटबाजी आ. नमिता मुंदडा यांच्यासह पंकजा मुंडे यांचीही डोकेदुखी वाढवणार....??
*बीड/सुनिल सिरसाट*
काल-परवा नुकताच बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस पार पडला. मुळात माझा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून अगदी साधेपणाने साजरा करावा असा संदेश खासदारांनी सोशल मीडियाच्या द्वारे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आवर्जून दिला होता. कार्यकर्त्यांनी जवळपास त्याचे पालनही केले. परंतु जिल्हाभरात हे घडत असताना केज विधानसभा मतदारसंघात मात्र हा वाढदिवस गटातटाच्या माध्यमातून अगदी जास्तच साधेपणाने साजरा होताना दिसून आला. कुठेही म्हणावे तेवढ्या प्रमाणात समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा होताना दिसून आला नाही.मात्र ईतरत्र जिल्हाभरात दिलेल्या सुचनेनुसार वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा केज मतदारसंघातील मतभेद चव्हाट्यावर आले असून यामुळे विद्यमान आ. नमिता मुंदडा यांच्यासह पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार......??
या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
------------------------------------
*नंदकिशोर मुंदडा-रमेश आडसकर आणि थोरातांनी पंकजा मुंडे यांच्याकडे बघून जरा सबुरीनच घ्यावं........सर्वसामान्यांचा सूर......!*
*तर आडसकर-थोरातांना आमदारांऐवजी नंदुशेठ मुंदडा (काकाजी) यांचीच ॲलर्जी;*
*तेंव्हा काकाजी जरा सबुरीनच घ्या...... मुंडे प्रेमींची साद.....!!*
------------------------------------
राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या नंदकिशोर मुंदडा यांच्या सल्ल्यामुळेच राष्ट्रवादीचे तिकीट घोषित झालेले असतानाही ऐनवेळी युवा नेता अक्षय मुंदडा यांनी पंकजा-प्रीतम मुंडे यांच्या बोटाला धरून चालणे मान्य करत भाजपात प्रवेश केला. उमेदवारीही मिळाली आणि विजयीही.....!
माजी आ.रोमन (पृथ्वीराज) साठे आणि सौ. संगीता विजयप्रकाश ठोंबरे यांच्यामुळे अडगळीत आलेला राजकीय प्रवास कायमस्वरूपी थांबतो की काय.....? या विवंचनेत असलेल्या काकाजी यांनी आपले पत्ते फेकत शरद पवारांसोबतच्या जुना संबंधांना गळ टाकत माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्या उमेदवारीला व्यवस्थितरीत्या बगल देत पुन्हा आपला गड मजबूत करून घेतला खरा....., परंतु मतदारसंघातील पुनर्रचनेत आपला विजय निश्चितपणे होईल का नाही.....?? या द्विदा मनस्थितीत असणाऱ्या नंदूशेठ यांनी आपल्या अभ्यासांती ऐनवेळी भाजपात येण्याचा निर्णय घेत पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मान्य करत अशी काही बाजी मारली की, कुठेतरी दूरपर्यंत गेलेले आपले राजकीय तक्त (गतवैभव) मुंडे भगिनींच्या कृपाशीर्वादाने एका झटक्यात परत मिळवले. परंतु केवळ मुंडे भगिनींच्या आदेशापायी जुळवून घेऊन ईमानीइतबारे काम करून केजची जागा राखण्यात या आडसकर-थोरात जोडीने आपला सिंहाचा वाटा उचलला. विजयानंतर ते पहिल्या चार-सहा महिन्यातच मुंदडा कुटुंबापासून असे काही बाजूला झाले की, या तिन्ही कुटुंबात किती वर्षांपासून हाडवैर आहे असाच प्रश्न उद्भवला.....! त्यातच रमेश आडसकरांचा गत वेळी माजलगाव मतदारसंघातून अगदी निसटता झालेला पराभव. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्याने त्यांना जास्त वेळ माजलगाव मतदारसंघातच अडकून राहवे लागत आहे. तर डॉ.अशोक थोरात हे जरी शासकीय अधिकारी असले तरी त्यांची एक अधिकारी म्हणूनही बीड जिल्ह्यातील पकड किती मजबूत आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय राजकारणापलिकडे कौटुंबिक नाते निर्माण करण्याची अफलातून असलेली त्यांची हातोटी पाहता तेही त्यांच्या परीने या मतदारसंघात ब-यापैकी मजबूत आहेत. तसेच डॉ.योगिनी जायभाये-थोरात यांच्या रूपाने घरातच जि.प.सदस्यत्व तेही संबंधित केज मतदारसंघातीलच होळ सर्कलच्या माध्यमातून असल्याने त्यांचीही आता आपापल्यापरीने घट्ट पकड असल्याने तेही त्यांच्या जागी भक्कम असून मुंडे कुटुंबासोबत अगदी जवळचे संबंध ठेवून आहेत. त्यातच डॉ.अशोक थोरात यांची बदली इतरत्र झाल्याने तेही जिल्हा बाहेर गेले-गुंतले. मग अशातून आडसकर-थोरात यांचे साहजिकच दुर्लक्ष होत असून अगदी तुटपुंज्या संपर्कातून त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या अडचणी सुटण्याऐवजी वाढतच गेल्या. बरं....., त्यांचे जरी दुर्लक्ष झाले तरी पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून सारकाही सुरळीत चाललं असतं. परंतु सध्या त्यांच्याही पदरी पक्षातून अवहेलना सुरू असल्याने पदरी सारी निराशाच......!
उरला प्रश्न आता डॉ. प्रीतम मुंडे यांचा. त्याजरी संपूर्ण जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार असल्या तरी एकीकडे त्यांची केंद्रीय मंत्रीपदी अपेक्षित असलेली न लागलेली वर्णी, तर दुसरीकडे मोठी बहीण माजी मंत्री पंकजा मुंडे यांची सातत्याने होत असलेली प्रातर्ना. यात त्याही आशाकाही भरडून गेल्या आहेत की, त्या वरतून कितीही दाखवत असल्या की, माझे संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष आहे. तरी त्या आतून मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि मग अशातच आपल्याच लोकांमधील गटबाजी हे सारंकाही आहे त्या अडचणीत आणखीनच भर घालणारे.....! एकीकडे आडसकर-थोरात दोघेही महत्त्वाचे, तर दुसरीकडे अक्षय यांच्याशी असलेले नाते अगदी जवळचे. यामुळे नंदकिशोर मुंदडा-रमेश आडसकर-थोरात यांच्यात जरी आपसात धुसफूस असली, तरी यांना हाताळून घेत राजकारण करायचे म्हणजे पंकजा मुंडे यांची आहे त्यात आणखीनच डोकेदुखी वाढणार हे निश्चित......!!
परंतु हे असे विदारक चित्र पाहता आणि नंदूशेठ यांचा राजकीय अनुभव पाहता मुंडे प्रेमी मात्र आडसकर-थोरात यांच्यावर नाराज होण्याऐवजी किंवा त्यांना दोष देण्याऐवजी काकाजींकडूनच अपेक्षा करताना दिसतात. पंकजा-प्रीतम मुंडे भगिनी ज्या अवस्थेतून चालल्या आहेत. ते पाहता गटतट अजूनच अडचणीत भर टाकणारे ठरतील हे तितकेच खरे.....! त्यात विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यात कमी वयात मोठ्या प्रमाणात राजकीय बाळकडू मिळालेल्या अक्षय मुंदडा यांनी जाहीरपणे पंकजा मुंडे यांची बाजू मांडत त्यांनाच ताकद द्यावी लागेल. गेटकेन मंत्री किंवा पुढारी बीड जिल्ह्याचे सारले करू शकत नसल्याचे अगदी छातीठोकपणे सांगितले. तर नेमका केंव्हाचा....कधीचा......कुठचा.....? राग मनात धरून नंदूशेठ आडसकर-थोरात यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पाण्यात बघत आहेत हे कळायला मार्गच नाही.....? विकास कामात व वैयक्तिक कामात मापात का पाप करतायेत......?? असाही प्रश्न मुंडे भक्त विचारत आहेत. तर आडसकर व थोरात यांनीही ईतके ताणने योग्य आहे का.....??? एकीकडे ताईंची अवस्था समजून घेत अक्षय ममुंदडा हे *बाप से बेटा सवाई....!* ठरत आहेत. तर आपल्या वैयक्तिक हेव्यादाव्यात काकाजी-आडसकर-थोरात यांना एकंदरीत जिल्ह्यातील भाजपाची आणि मुंडे भगिनींची अवस्था का दिसत नाहीये.....? का ते दिसून न दिसल्याचे भासवत आहेत.....?? असे एक ना अनेक उदिग्ध प्रश्न या गटातटाच्या राजकारणामुळे सध्या मुंडे प्रेमींना भेडसावत असून प्रत्येकजण नंदूशेठ यांच्या एकंदरीत राजकीय अनुभव व जनतेच्या प्रश्नासाठी वेळेचे भान न ठेवता सदैव असलेली तत्परता पाहता आडसकर-थोरात यांच्याऐवजी काकाजींनाच साद घालत आहेत की,
*"काकाजी जरा सबुरीने घ्या हो.....!"* वेळ खडतर आहे. जिथे ताईंचाच प्रवास खडतर आहे तिथे तुमचा तर आणखीण जास्तच कठीण होऊन बसेल. तेंव्हा बाकी सारकाही मागे टाकून कमीत कमी लेकी आणि सुनेसाठी तरी दोन पाऊले मागे सरका आणि संपवा एकदाचे हे गटातटाचे राजकारण. नाहीतर पंकजा मुंडे यांची थोडीफार डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे. परंतु आ. नमिता मुंदडा यांच्यासह अक्षय मुंदडा व तुमच्या डोकेदुखीत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होईल हे निश्चित......!! तेंव्हा करा मोठे मन आणि दाखवा तुमच्या आजपर्यंतच्या राजकीय दांडग्या अनुभवाचा प्रत्यय...., अशीच काहीशी भावना आणि सूर कार्यकर्त्यांच्या मध्ये दिसून येत आहे......!