गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अबब..आता तर जिल्हाधिकारी यांची बनावट सही आणि शिक्याचाही केला वापर
मनोज फुलबोयणे याने आणखी एक घातला सरकारी तिजोरीला लाखोंचा गंडा
साहेब...नामानिराळे , कर्मचारी मात्र अडकणार..!
![]() |
मुख्य आरोपी-लिपीक मनोज फुलबोयणे |
"लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता भ्रष्टाचाराने कळस केला असून साधा कारकुन तिन आयपीएस असणार्या अधिकार्यांच्या समोर बनावट सह्या करुन आणि आता तर लातूर मधील कार्यकाल संपलेल्या जिल्हाधिकार्यांची(हे फक्त २०१५ पासुनची तपासणी असल्याने,यामागची तपासणी केल्यास आजुन किती जिल्हाधिकार्यांच्या बनावट सह्या केल्या आहेत हे तपासणी केल्यास समोर येईलच.)बदली झाल्यानंतर त्यांची बनावट सह्या आणि शिक्याचा वापर करुन तब्बल ३५लाखाला सरकारी तिजोरीला गंडा घातल्याने आता मागील आणि त्यानंतर रुजु झालेल्या जिल्हाधिकार्यांचे धाबे दनानले आसल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.जिल्हाधिकार्यालयातील एका कारकुना पासुन ते आता जिल्हाधिकार्यां पर्यंत धागेदोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली असुन आता हा तपास सी बी आय ला देण्याची वेळ आली असल्याचे आता जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.एक कारकुन एवढे सर्व करणे अशक्य असल्याने साहेब...नामानिराळे , कर्मचारी मात्र अडकणार..! अशीच अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.आता भाजपच्या किरिट सोमय्या यांनी लातूर दौर्या दरम्यान भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असे विधान केले होते,आता मात्र त्यांनी याप्रकरणी लातूर मध्ये तळ ठोकून बसावे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला लाडलेली भ्रष्टाचाराची किड मुळापासुन नष्ट करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे "
लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचा लिपीक मनोज फुलबोयणे याने आणखी एक फंडा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी २२ कोटींच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आणखी ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फुलबोयणे याच्यासह पूर्वीच्या गुन्ह्यातील दोघे व अन्य एकजण अशा एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी महसूल शाखेत कार्यरत असलेला लिपीक मनोज फुलबोयणे याने २०१५ ते २०२१ या कालावधीत शासकीय योजनेचा २२ कोटींचा चौघांवर गुन्हा दाखल निधी बेकायदेशीरपणे अन्य व्यक्तीच्या खात्यात वर्ग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळउडाली होती . दरम्यान, या प्रकरणाला आतावाचा फुटल्यामुळे लिपिक मनोज फुलेबोयणे याचे एक एक प्रकरण बाहेर येवू लागले आहे.महेश मुकंदराव परंडेकर (वय ४७, रा. लातूर शहर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,जिल्हाधिरी कार्यालयातील लेखा शाखेतील लेखा १या संकलनाचा लिपीक सहाय्यक या पदाचा पदभार
असताना आरोपी मनोज नागनाथ फुलबोयणे (रा. बोरी, ता. लातूर) याने तत्कालान जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून पदभार नसलेल्या २६ ऑक्टोबर २०१५ ते १२ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत डॉ. बिपीन शर्मा यांच्या स्वाक्षरीशी साक्षर्म असलेली स्वाक्षरी अप्रमाणिकपणे व बनावटरित्या केली आणि जिल्हाधिकारी लातूर व कलेक्टर लातूर या शिक्क्याचा गैरवापर करुन बनावटीकरण केलेल्या धनादेशाद्वारे आरटीजीएस व नेफ्टीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून धोंडपंत शेषेराव बिराजदार, ऋषिनाथ ए बोरी व सुधीर रामराव देवकत्ते यांच्या नावे वेगवेगळ्या तारखेमध्ये एकत्रित ३५ लाख रुपये वर्ग केले. या सर्वांनी शासकीय रकमेचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरनं. ७७/ २०२३ कलम ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७४, ४७७, ४७७ (अ), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोउपनि लोखंडे करीत आहेत.
जिल्हाधिकारी यांचा कार्यकाल
डॉ. विपिन शर्मा, आयएएस
13.06.2011
02.08.2014
श्री. पांडूरंग पोले, आयएएस
02.08.2014
29.04.2017
श्री. जी. श्रीकांत,आयएएस
29.04.2017
10.12.2020
श्री. पृथ्वीराज बी .पी ,आयएएस
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, लातूर्
महाराष्ट्र् राज्य,भारत -413512
पदभार घेतल्याचा दिनांक- 10/12/2020