छत्रपती शिवजयंतीनिमत्त आपण सर्वजण लातूरकरांची भव्य दुचाकी रॅली
शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी ः- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमत्त रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी आपण सर्वजण लातूरकरच्या वतीने शहरातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत हिंदु टायगर आ. टी राजा यांचा सहभाग राहणार असून अधिकाधिक संख्येने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आपण लातूरकरांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची परंपरा आहे. तसेच जयंतीनिमित्त प्रतिवर्षी आपण लातूरकरांच्या वतीने शहरातून भव्य दुचाकी रॅलीही काढण्यात येते. त्यानुसारच शिवजयंतीनिमत्त आपण सर्वजण लातूरकरांच्या वतीने उद्या सिद्धेश्वर देवस्थानपासून सकाळी 10 वा. भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली मार्गस्थ होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्यास या रॅलीच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये हिंदु टायगर आ. टी राजा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचाही या रॅलीत सहभाग राहणार आहे.
या रॅलीत शहर व परिसरातील शिवप्रेमी नागरीकांसह युवक, युवती, विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी आणि समस्त लातूरकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आपण सर्वजण लातूकरांच्या वतीने करण्यात आलेले आहे.