गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये माजी जिल्हाधिकार्याचा वावर वाढला;एक टॅटू असलेल्या मुलाच्या खात्यावर होतोय लाखोंचा व्यवहार
लातूर-लातूर शहरामध्ये सध्या भ्रष्टाचार पावला पावलावर उफाळत असून एका कारकूना पासुन ते जिल्हा-अधिकार्यापर्यंत भ्रष्टाचाराची पाऴे मुळे रोवली गेली असल्याचे आता लपुन राहिले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या २२करोड च्या भ्रष्टाचारात काही नायब तहसीलदार,तहसीलदार यांच्या चौकशा चालू असून त्यामुळे आपलेही नाव कोठे येईल या भीती पोटी घाबरलेले माजी जिल्हाअधिकारी लातूर जिल्हाधिकार्यालयात चकरा मारत असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली असुन एका एका माजी जिल्हाधिकार्याचा टॅटू असलेल्या मुलाच्या खात्यावर मागील काही वर्षापासून लाखोंचा व्यवहार होत आहे, विशेष म्हणजे तो मुलगा फायनान्स आणि बीसीच्या माध्यमातून लाखोंचा व्यवहार करत आहे.त्याच्या खात्यावर येणारा फंड तो विटभट्टी ,फायानान्स,बीसी च्या माध्यमातून व्हाईट करुन संबंधीत अधिकार्याला देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .त्यातच आता या २२करोडच्या घोटाळयामुळे तो अधिकारी पुर्णतहा हैराण झाला असुन त्याचे लातूरला येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.नेमके आता याप्रकरणात कोणते वळण मिऴेल हे वेळच ठरवेल परंतू यामध्ये बरेच मोठे अधिकारी अडकण्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत.