यंदाचा अर्थसंकल्प संपूर्ण जगाला दिशादर्शक – सुधीरजी धुत्तेकर
सोलापूर : काँग्रेस सरकारच्या काळात अर्थसंकल्पात केवळ घोषणा केल्या जात होत्या. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात मात्र विकासाचा संकल्प करुन अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा प्रमुख मुद्द्यांवर अर्थसंकल्प सादर करुन सर्व वर्गाला न्याय दिला असल्याचे मत भाजपा प्रदेश उद्योग आघाडी सरचिटणीस सुधीरजी धुत्तेकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय वित्त मंत्री निर्माला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सुधीरजी धुत्तेकर बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीच्यावतीने दुस्सा लॉन येथे अर्थसंकसंकल्पीय कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहर अध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते. ते म्हणाले, हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाहीतर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला अर्थसंकल्प आहे. कोरोनाच्या २८ महिन्याच्या काळात ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले. काँग्रेसच्या काळात ज्या योजनांचा विचार करण्यात आला नाही, अशा योजना मोदींच्या काळात कार्यान्वित झाल्या असून त्याचा कोट्यावधी लोकांना फायदा झाला आहे. एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना आणि जग जेव्हा मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकले आहे. संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सुधीरजी धुत्तेकर म्हणाले. संघटक सरचिटणीस रुद्रेशजी बोरामणी सरचिटणीस शशीभाऊ थोरात, कोषाध्यक्ष गोविंद गवई,व्यापार आघाडी प्रदेश सस्यद श्रीनिवास दायमा,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व्यापार आघाडीचे अध्यक्ष जयंत होले पाटील ,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चिटणीस नागेश सरगम यांनी केले ,यावेळी परिवहन सभापती जय साळुंके, मा सभागृह नेते श्रीनिवास करली, शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, मंडल गध्यक्ष सुनील गौडगाव, महेश देवकर , शिवशरण बब्बे ,सुकुमार सिध्दम, गणेश पेनगोंडा, सत्यनारायण गुर्रम,सदानंद गुंडेटी,आनंद बिर्रु,दत्तात्रय पोसा,श्रीनिवास पुरुड, विजय इप्पाकायल, मनोज कलशेट्टी , बिराजदार, नरेंद्र पिसे, आदींसह पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते