Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल भाजयुमोकडून तीव्र निषेध

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल  भाजयुमोकडून तीव्र निषेध



लातूर दि.06-02-2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आ.जितेंद्र आव्हाड यांनी आपले अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्‍तव्य करून सर्वसामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे लातूर भाजपा युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्‍त करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी विक्रांतदादा पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर, लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे नेते तथा आ.जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून व त्यांच्या निषेधार्थ जाहीर घोषणाबाजी करून जाहीर निषेध व्यक्‍त करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, राहुल भूतडा, सुनिल राठी, पांडुरंग बोडके, आकाश बजाज, राजू सोनवणे, प्रियंका जोगदंड, महादेव पिटले, योगेश गंगणे, ईश्‍वर कांबळे, चैतन्य फिस्के, मंदार अराध्ये, निरज पाटील, मल्हारी भोसले, अक्षय येचवाड यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापुरूषांची बदनामी थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल - अजितसिंह पाटील कव्हेकर
राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनीही मागील काळात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते आणि आतातर राष्ट्रवादीचे नेते तथा जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषय घृणास्पद वक्‍तव्य करून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम केलेले आहे. या पुढेही राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांनी महापुरूषांचा अपमान करणे थांबविले नाही तर त्यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिला.
Previous Post Next Post