गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
५० लाखाचा फंड पाच दिवसात फस्त...क्रिडा अधिकारी मस्त..!
अखेर जाहिरात नाहिचं....म्हणे जिल्हाधिकारी साहेबांनीच सांगीतले
लातूर-छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे १५ फेब्रुवारी रोजी चालू झाली आणी आता समारोपही जवळ आला परंतु या अतिशय नावाजलेल्या आणी लातूरला अभिमान असलेल्या स्पर्धे साठी मात्र ज्यांनी ज्यांनी मनापासुन प्रसिध्दी दिली अशा साप्ताहिक आणि दैनिकांना मात्र तोंडाला पाने पुसली असुन अखेर जाहिराती नाहिचं म्हणुन प्रेस संपादक व पत्रकार संघाचे अध्यक्ष लहु शिंदे यांना निरोप देण्यात आला असुन आमचं काहिही नाही...साहेबांनीच देवू नका म्हणुन सांगीतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने पत्रकारांमध्ये एकचं खळबळ उडाली आहे .यावर आता ५० लाखाचा फंड पाच दिवसात फस्त...क्रिडा अधिकारी मस्त..!अशी चर्चा संपुर्ण लातूर जिल्ह्यात च नव्हे तर महाराष्ट्रात होत आहे.
वास्तवीक पाहता हा अधिकार्यांमार्फत मा जिल्हाधिकारी यांच्या नावाने हे जाहिरात प्रकरण दाबण्याचा प्रकार दिसत असुन ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रेस कांफ्रेंस झाली त्या दिवशी उपसंचालक मोरे यांनी जिल्हा माहिती अधीकारी युवराज पाटील यांच्यासमक्ष काही दैनिकांना स्वत:हुन जाहिराती देणार असल्याचे सांगीतले त्यानंतर साप्ताहिक पेपर चालवणार्या संपादकांनी साप्ताहिक पेपर ला जाहिराती देणार नाही का?असे विचारले असता चक्क नाही.. असे म्हटले होते त्यावेळेस मा जिल्हाधिकारी हे उपस्थित नव्हते मग जिल्हाधिकारी साहेब तिन दिवसानंतर ...अशा मुजोर आणि भ्रष्ट अधिकार्यांच्या स्वप्नात येवून जाहिरात देवू नका म्हणुन सांगितले कि काय...? अशा या बेताल वक्ताव्यामुळे सध्या संपुर्ण लातूर जिल्ह्यात च नव्हे तर महाराष्ट्रात जिल्हाधिकार्यांची बदनामी होत आहे.आता तर फक्त ५०लाख फस्त केल्यात जमा आहेत,आजुन लाखोंचा फंड बाकी आहे ,पुढील येणारा लाखोंचा फंड मा जिल्हाधिकारीच मंजुर करणार आहेत बहुतेक हे मस्तवाल अधिकारी विसरले असावेत...!वेळीच अशा अधिकार्यांवर जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही नाही केली तर येणारा लाखोंचा फंड ही लोकं गायब करतील यात काही शंका नाही.