Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शस्त्र प्रदर्शन व्याख्यान आणि हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी --खासदार सुधाकर शृंगारे यांचे शिवजयंतीला विशेष उपक्रम --

शस्त्र प्रदर्शन व्याख्यान आणि हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी --खासदार सुधाकर शृंगारे यांचे शिवजयंतीला विशेष उपक्रम -- 












 (लातुर-प्रतिनिधी)--- छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती खासदार सुधाकर शृंगारे यांनी विविध उपक्रमांनी साजरी केली आहे. लातुरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ऐतिहासिक शस्त्र आणि किल्ल्यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तर शिवकालीन संस्कृती या विषयावर विक्रमसिंह पाटील यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले . लातुर शहरासह उदगीर, निलंगा,अहमदपूर या शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. 
----अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून खासदार सुधाकर शृंगारे यांनी शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. लातुर मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शस्त्र आणि चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहास विषद करणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई लढण्यासाठी ज्या पद्धतीच्या शस्त्रांचा वापर केला त्या काळातील शस्त्र आणि शस्त्रांच्या चित्रांचे हे प्रदर्शन होते, या प्रदर्शनात प्रामुख्याने पंकज दुसाने, रवि पवार, श्रीनिवास कचरे यांनी नागरिकांना माहिती दिली. या शस्त्र आणि चित्र प्रदर्शनामुळे महाराजांच्या काळात काय जीवन पद्धती असेल याचे चित्रच लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहिले.
-- शिवकालीन शस्त्र आणि गड किल्ल्यांचा इतिहास या विषयावरील विक्रमसिंह पाटील यांच्या व्याख्यानालाही लातुरकरानी चांगला प्रतिसाद दिला. ब्रिज हॉलमध्ये झालेल्या या व्याख्यान प्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे हे स्वतः उपस्थित होते. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अवगत करण्याचा हा चांगला प्रयत्न ठरला. व्याख्यानाला युवक युवतींची उपस्थिती मोठी होती. 
--कोविड काळानंतर मोठ्या उत्साहात झालेली ही बहुधा पहिलीच जयंती असावी या जयंतीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतुन लातुर शहरासह उदगीर, निलंगा आणि अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. लातुर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर हेलिकॉप्टरने करण्यात येणारी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी हजारो नागरिक एकत्र आले होते. जयंती दिनी खासदार सुधाकर शृंगारे यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या मंचावर उपस्थित राहून विक्रमी संख्येने उपस्थित असलेल्या युवक,युवतींशी संवाद साधला.लातुर शहरासह लोहा,अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जयंतीदिनी उपस्थित राहून वंदन केले आहे. खासदारांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जयंती साजरी केल्याने शिवप्रेमींत ते चर्चेचा विषय बनले आहेत
Previous Post Next Post