13 ते 15 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
*मुंबई* : मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
त्याचवेळी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.