Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महावितरण विभागाचा सहायक अभियंता गोविंद सर्जे याला 22000/रु ची लाच घेताना रंगेहाथ अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महावितरण विभागाचा सहायक अभियंता गोविंद सर्जे याला 22000/रु ची लाच घेताना रंगेहाथ अटक




लातूर- 
ग्राहकाच्या प्रोजेक्ट करिता टेक्निकल फिजीबिलीटी (तांत्रिक योग्यता) देण्यासाठी तक्रारदार यांना महावितरण विभागाचे सहायक अभियंता गोविंद सर्जे यांनी सुरुवातीस 30,000/- रु. ची व तडजोडी अंती 22,000/- रु. ची पंचासमक्ष लाच घेतल्याप्रकरणी लातूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

   मिळालेल्या माहितीवरून तक्रारदार यांचा सोलार इंस्टॉलेशन चा व्यावसाय असून त्यांनी हाती घेतलेल्या ग्राहकाच्या प्रोजेक्ट करिता टेक्निकल फिजीबिलीटी (तांत्रिक योग्यता) देण्यासाठी तक्रारदार यांना महावितरण विभागाचे सहायक अभियंता गोविंद सर्जे यांनी सुरुवातीस 30,000/- रु. ची व तडजोडी अंती 22,000/- रु. ची पंचासमक्ष लाच मागणी केली. 
      लाच मागणी केलेली रक्कम घेवून तक्रारदार हे लोकसेवक यांना त्यांचे कार्यालयात जावून भेटले असता आलोसे गोविंद सर्जे यांनी मागितलेली लाचेची रक्कम 22,000/- रु. स्वतः पंचासमक्ष स्विकारली. 
     आलोसे यांना लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
        डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, 
        अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
      
➡ *पर्यवेक्षण अधिकारी:-*
       पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
       अँटी करप्शन ब्यूरो, लातूर

➡ *सापळा पथक मदत पथक :-*
       अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक 
       भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक, अँटी 
      करप्शन ब्यूरो, लातूर व एसीबी टीम लातूर

➡ *तपास अधिकारी:-* 
      अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक,  
      अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.

-------------------------------------------------
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, 
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर - 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक, 
अँटी करप्शन ब्यूरो, लातुर
मोबाईल नंबर - 09309348184
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी - 02382-242674
@ टोल फ्रि क्रं. 1064
Previous Post Next Post