गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रंगपंचमीला गालबोट... गांधी मार्केट परिसरात एकाची हत्या
लातूर-लातूर मध्ये रंगपंचमीला गालबोट..लागले असून गांधी मार्केट परिसरात एका भंगार गोळा करणार्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हत्या करण्यात आल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत गांधी चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असूनआरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार
दुकानासमोर झोपलेल्या एका अज्ञात ५५ ते ६० वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचुन खुन करण्यात आल्याची घटना, शनिवारी (दि. ११) मध्यरात्री शहरातील गांधी मार्केट परिसरातील एका दुकानासमोर घडली. या संदर्भात एका २३ वर्षीय तरुणाविरोधात गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागील बाजुस गांधी मार्केट परिसरात दगडाने ठेचुन खुन करण्यात आल्याची घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली असता मयत ५५ ते ६० वर्षांचा असल्याचे निदर्शनास आले. अधीक चौकशीअंती हादिवसभर भंगार, कचरा वेचण्याचे काम करुन रात्री गांधी मार्केट परिसरात मिळेल त्या जागेवर झोपणारा साधारण ५५ ते ६० वर्षे वयाच्या या मयत व्यक्तीजवळ, त्याची ओळख पटेल असे काहिही आढळून आलेले नाही. ज्याने त्याचा खुन केला त्याही आरोपीस त्याची विशेष ओळख नाही. केवळ त्याच्या खिशातील पैसे काढून घेत असताना झटापट झाली आणि यातुन त्याचा खुन केल्याची त्याने कबुली दिली आहे. त्यामुळे, मयत व्यक्ती नेमकी कोण आहे याचा अद्याप शोध लागलेला नाही. कदाचीत ती बेघर, वेडसर असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तुर्तास मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असल्याचे गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी सांगीतले.
खुन खाडगाव रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या अविनाश धनाजी चव्हाण (वय २३) याने केल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो व्यसनी असुन भुरटा चोर असल्याचे समोर आले. मयत हा भंगार गोळा करणारा असुन त्याच्या खिशात पैसे असल्याची शंका अविनाश धनाजी चव्हाण याला आली होती. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री दिड ते २ वाजेच्या सुमारास मयत गांधी मार्केट येथील ज्या दुकानासमोर झोपला होता त्या ठिकानी जावून अविनाश धनाजी चव्हाण याने त्याच्या खिशातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला त्याच्या खिशात २० रुपये सापडले. परंतु त्याच्याकडे अधीक पैसे असावेत अशी शंका आल्यानंतर मयत व्यक्तीस जाग आली आणि दोघांत झोंबाझोंबी झाली. यावेळी अविनाश चव्हाण याने जवळच पडलेल्या दगडाने त्याच्या डोक्यात वार करुन त्याचा खुन केला. पोलिसांनी अविनाश चव्हाण यास अटक केली असुन त्याच्या विरोधात गांधी चौक पोलिसांत गुरनं १२३ / २३ कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पोलिसांनी आवळल्या मुस्क्या..
शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेल्या देविका लाईट हाऊस या दुकानासमोर झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा आवळल्या मुसक्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात
एमआयडीसी पोलिसांना यश आले असून सदर आरोपीस गांधी चौक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
गांधी मार्केट परिसरात एक ५५ ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती. सदर घटना घडताच प्रभारी पोलीस उपाधीक्षक सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गोरख दिवे, पोह बेल्लाळे, पोह चामे, पोना भोसले, पोह राजपुत, पोना मदने, जाधव यांचे पथकास आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले होते. या पथकाने गांधी मार्केट परिसरातच बसस्थानकाच्या मागील बाजुस लपून बसलेल्या अविनाश धनाजी चव्हाण (वय २३) यास अटक केली. आरोपीने खुनाची कबुली दिली असून त्याला गांधी चौक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.