गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रायवाडी हद्दीत तिर्रट जुगारावर धाड
सहा जुगार्यासह ;५ लाख ३९ हजार १०० रुपयांची रोकड जप्त
लातूर : एकिकडे पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कडक पावले उचलत असताना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या रायावाडी शिवारात तिर्रट जुगाराचा डाव रंगत असल्याची बाब समोर आली आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत सहा जुगारी अडकले असुन त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ५ लाख ३९ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
या संदर्भात अधीक माहिती अशी की, हरंगुळ ते रायवाडी पानंद रस्त्यावरील रायवाडी शेत शिवारात टी बोमणे याच्या शेताजवळील पत्र्याच्या शेड समोर काही लोक लाईटच्या उजेडात बसुन पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आलेवार, पोलीस उपनिरिक्षक जाधव,
नवनाथ हासबे, पो.ह. मोहन सुरवसे, पोना तुराब पठाण, पोना रवि कानगुले, पो.ह. मधव बिलापट्टे यांचे पथक घटनास्थळी पोचले असता तिथे काही लोक तिर्रट जुगार खेळत असल्याचे आढळून आले. जुगार खेळताना घटनास्थळावरुन वैभव प्रदीप सुडके (वय २०, रा. खुंटेगाव ता. औसा), ईश्वर प्रदीप सारगे (वय ३४, रा. कव्हा, ता. लातूर), अमर बालाजी माने (वय २५, रा. साळेगल्ली, लातूर), महेश मनोहर सारगे (वय ३२, रा. कव्हा, ता. लातूर), फिरोज रशीद शेख (वय ३०, रा. चौधरीनगर, लातूर), संजय काकासाहेब भोसले (वय ४३, रा. आनंदनगर, लातर) हे घटनास्थळी आढळून आले. याच वेळी, पोलीसांची धाड पडताच काही लोक पळून गेले.
या पळून गेलेल्या लोकांबद्दल अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता पळून जाणाऱ्यांत सय्यद उर्फ अजर शेख (वय ३५, रा. लातूर), संदेश शिंदे (वय ४०, रा. विवेकानंद चौक लातूर), संतोष उर्फ बंटी गंगाराम बोमणे (वय ३७, रा. रायवाडी ता. लातूर) यांच्यासह अन्य ६ ते ७ व्यक्तींचा समावेश असल्याचे समोर आले. या संदर्भात घटनास्थळावरुन पाच दुचाकी, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा जवळपास ५ लाख ३९ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार माधव बिलापट्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.