Ads by Eonads
शिवसेना लातूर जिल्हा शाखेच्या वतीने शिवछत्रपती ग्रंथालयास ऐतिहासिक ग्रंथ भेट
लातूर : तिथीप्रमाणे कृतीतून शिवजयंती साजरी करताना शिवसेना लातूर जिल्हा शाखेच्या वतीने लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील शिवछत्रपती ग्रंथालयास छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक ग्रंथ भेट देण्यात आले.
शिवसेनेचे लातूर शहर प्रमुख दिनेश बोरा, एड. परवेज पठाण, एड. अर्जुन जाधव, शहर संघटक संदीपमामा जाधव यांच्या नियोजन व जिल्हा प्रमुख एड. बळवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीचे औचित्य साधून कोणताही अवास्तव वा अनावश्यक खर्च न करता भावी पिढीला छत्रपतींचा वास्तव इतिहासाचे परिपूर्ण ज्ञान मिळावे या उद्देशाने शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक ग्रंथ भेट देण्यात आले. हे ग्रंथ खास करून वाचनालयात अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या हस्ते वाचनालयास भेट देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, सतीश देशमुख, तालुका प्रमुख राजकुमार सुरवसे, सदाशिव गव्हाणे, जिल्हा कार्यालय प्रमुख संजय मुरगे , उपशहरप्रमुख विजयकुमार कांबळे, श्रीनिवास लांडगे, चंद्रकांत शिंदे, एड. बालाजी सूर्यवंशी यासह इतर शिवसैनिक , विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.