Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुजराती महाठग किरणभाई पटेल यानी केले ‘झेडप्लस’ सुरक्षे आणि बुलेटप्रुफ गाडीचा वापर

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गुजराती महाठग किरणभाई पटेल यानी केले ‘झेडप्लस’ सुरक्षे आणि बुलेटप्रुफ गाडीचा वापर 


पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याचे सांगत जम्मू-कश्मीरमध्ये झेडप्लस सुरक्षा आणि बुलेटप्रुफ गाडीचा वापरकरणार्या गुजराती महाठकास अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हाच तो 'महाठग' किरण पटेल!

याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणेच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली. अमित शहा आणि स्वतःला जेम्स बॉण्ड समजणारे अजित डोवाल यांना सुध्दा कळले नाही की हा तोतया सरकारी अधिकारी आहे. 

*हा गुजराती ठग भारतीय सेनेच्या जवानांना गृहखात्याचा अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्या मिटिंग घेतो, Y+ सुरक्षा घेतो, काश्मीर दौरा करतो, तिथे त्याला पंचतारांकित हॉटेल ललितमधील रुम क्रमांक ११०७ देण्यात येते, सोबत पीएसओ आणि एस्कॉर्ट देण्यात आले होते. तिथे त्याने अनेक बैठका घेतल्या, पटेल याने कडेकोट बंदोबस्तात सीमारेषा व श्रीनगरच्या लाल चौकातील क्लॉक टॉवरला भेटही दिली.

इतकी गंभीर चूक होऊन सुद्धा प्रसार माध्यमे चिडीचूप आहेत. ही अशी चूक जर काँग्रेसच्या काळात घडली असती तर प्रसार माध्यमांनी अक्षरशः थयथयाट करुन आदळआपट केली असती.

पण नेमकं देशात सुरू काय आहे? स्वयंघोषित चाणक्यच्या नाकाखाली सुरु असलेले हे प्रकार देशासाठी अत्यंत धोकादायक आहेत.


मिळालेल्या माहितीवरून पंतप्रधानांच्या नावाने किरण भाई पटेल या गुजराती महाठगाने ‘झेडप्लस’ सुरक्षेचा वापर केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुजरातच्या किरण भाई पटेल याने आपण पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याचे सांगत जम्मू-कश्मीरमध्ये झेडप्लस सुरक्षा आणि बुलेटप्रुफ गाडी दिमतीला मिळवली होती. मात्र संबंधित व्यक्ती बोगस अधिकारी निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती. दहा दिवसांच्या या घटनेबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली होती. किरण पटेल याने फेब्रुवारी महिन्यातही जम्मू कश्मीरचा दौरा केला होता. तेव्हा त्याने गुजरातमधून जास्तीत जास्त पर्यटक कसे आणता येतील याबाबत अधिकाऱयांची बैठक घेतली होती. तेव्हा संशय आल्याने जम्मू कश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना अलर्ट केले. यानुसार पुन्हा जम्मू कश्मीरच्या दौऱयावर आलेल्या पटेलच्या हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली. तो बोगस अधिकारी असल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली.यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन अशाप्रकारचे नेमके किती ठग भारतात फिरत आहेत याची सखोल चौकशी पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात यावी जणेकरुन देशाची सुरक्षा अबाधीत राहिल.
Previous Post Next Post