Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

" डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फूट उंचीचा स्टॅचू ऑफ नॉलेज " उभारायला सरकारची मान्यता

  Ads by Eonads
" डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फूट उंचीचा स्टॅचू ऑफ नॉलेज " उभारायला सरकारची मान्यता 
                                   --खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश --
                       पुतळा उभारणी आणि पार्क सुशोभीकरणासाठी दहा कोटींचा निधी जाहीर












                                               -----------(लातूर-प्रतिनिधी )------------
                                   लातूर शहरात ७५ फूट उंचीचा "स्टॅचू ऑफ नॉलेज " म्हणजेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारायला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे . या संदर्भातील आदेश काढून सरकारने या दोन्ही कामांची रूपरेषा आखून दिली आहे . खासदार सुधाकर शृंगारे यांनी ७५ फूट उंचीचा पुतळा उभारावा अशी सातत्याने मागणी करीत सरकारकडे प्रस्ताव दिला होता . खासदारांच्या या पाठपुराव्याला आता यश आले आहे. 
                                      मंगळवारी राज्य सरकारच्या वतीने पुतळा उभारणी आणि पार्कच्या सुशोभीकरणा संदर्भांतील अध्यादेश जारी करण्यात आला आहे . ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फूट उंचीचा पुतळा उभारावा ,त्याचबरोबर पार्कचे सुशोभीकरण करावे यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे. लातूर महानगर पालिकेकडे हा निधी लवकरच पाठवला जाणार आहे . याशिवाय जिल्हा प्रशासनाचे पार्क सुशोभीकरण आणि पुतळा उभारणीच्या कामावर नियंत्रण असणार आहे. 
                                 गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खासदार सुधाकर शृंगारे यांनी "स्टॅचू ऑफ नॉलेज " ह्या बाबासाहेबांच्या प्रतिकृतीची उभारणी केली होती . या प्रतिकृतीची चर्चा राज्यात सगळीकडे झाल्या नंतर याच ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा कायमस्वरूपी बसवावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली होती. या मागणीसाठी नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांनी आंदोलनेही केली आहेत . लोकांची मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोव्हेंबर मध्ये प्रस्ताव पाठविला होता . या मागणी संदर्भांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत अखेर " स्टॅचू ऑफ नॉलेज" म्हणजेच बाबासाहेबांचा ७५ फूट उंचीचा पुतळा उभारणीला मान्यता दिली आहे . पुतळा उभारणी संदर्भांतील अनेक परवानगी घेण्याची कार्यवाही खासदार सुधाकर शृंगारे यांनी पूर्ण करून घेतलेली आहे. क्ले मॉडेलची परवानगीही घेण्यात आलेली आहे. महानगर पालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजने अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे बाबासाहेबांचा कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा उभारणे व पार्कचे सुशोभीकरण करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत कामासाठी प्रमुख यंत्रणा म्हणून महानगर पालिका काम पाहणार आहे. राज्य सरकारने पुतळा उभारणीला मंजुरी दिल्याचे कळल्या नंतर लातूरमध्ये फटाके फोडून नागरिकांनी जल्लोष केला आहे . तर खासदार सुधाकर शृंगारे यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि स्थानिक नेत्यांचे आभार मानले आहेत . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिलला या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे ,अशी माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे . ७५ फूट उंचीचा "स्टॅचू ऑफ नॉलेज" देशातील नगिरकांना ऊर्जा देणारा ठरेल , यामुळे लातूरच्या वैभवात भर पडेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे .
Previous Post Next Post