Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन

लातूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन

लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला पूढे नेण्यासाठी लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास व्यासपीठाची निर्मिती
-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

ग्रामिण भागातील तरूणांना कला क्षेत्रात करिअर घडविण्याची मोठी संधी-जब्बार पटेल








लातूर (प्रतिनिधी) रविवार २६ मार्च २०२३

      आपली माती आपली माणस ही बांधीलकी जपण्याची परंपरा पूढे चालवत
लातूरात आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले आहे असे सांगून लातूर आणि
मराठवाडयातील सांस्कृतिक क्षेत्रात पूढे नेण्यासाठी भविष्यात हे नवे
व्यासपीठ उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,
सांस्कृतिक मंत्री व लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले
आहे.

विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन, अभिजात फिल्म सोसायटी
आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लातुर येथील पीव्हीआर
थिएटरमध्ये आयोजित ३ दिवसीय पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे
उदघाटन रविवारी सांयकाळी मोठया थाटात झाले या प्रसंगी माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख बोलत होते. या कार्यक्रमास पूणे इटरनॅशनल फिल्म
फेस्टिव्हलचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, आमदार धिरज देशमुख, एफटीआयचे माजी
अधिष्ठाता समर नखाते, किरण जाधव, रविंद काळे, विजय देशमुख, समद पटेल, शाम
जैन, जितेद्र पाटील, प्राचार्य डॉ.एम.व्हि.बुके, प्राचार्य
डॉ.बी.एस.वाकूरे यांच्यासह व अभिजात फिल्म सोसायटीचे पदाधिकारी, लातूर
जिल्हयातील लोकप्रतिनिधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या
कडीमध्ये आता लातूरचे नाव जोडले गेले आहे. यानिमित्ताने जागतिक
परिस्थितीची आणि संस्कृतीची ओळख या परीसरातील चित्रपट रसीकांना होणार
आहे. कलाकारासाठी नवीन दालन उपलब्ध झाल्याने त्यांना आपल्या कलेमध्ये
सुधारण घडवून आणता येणार आहे. आगामी काळात लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाचे व्यासपीठ अधिक व्यापक केले जाईल, देशपातळीवरील कलाकारा सोबतच
स्थानीक कलाकाराचाही गौरव या ठिकाणी केला जाईल यातून स्थानीक कलाकरांना
प्रोत्साहन मिळेल त्याच बरोबर या ठिकाणी चित्रपट निर्मीतीही होऊ शकेल ही
अपेक्षा आहे असे त्यांनी म्हटले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चित्रपट
महोत्सवातून लातूरसह मराठवाडयातील सिनेरसीक मनमुराद आनंद घेतील, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लातूर हे मोठे शैक्षणिक केंद्र आहे. येथून असंख्य डॉक्टर, इंजिनीअर
निर्माण होत आहेत. या परिसरात मोठी गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला कला
क्षेत्रातही वाव मिळावा म्हणून येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे
आयोजन केले आहे. या व्यासपीठाचा येथील तरूणपीढी लाभ घेईल असा विश्वास
पूणे आतंरराष्ट्रीय फिल्मफेअचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी यावेळी व्यकत
केला.

जगभरात नेमक्या कोणत्या घडामोडी घडताहेत तेथील तंत्रज्ञानात कसे बदल होत
आहेत याची माहिती राज्यातील प्रत्येक युवकाला व्हावी त्याला त्यातून
प्रेरणा मिळावी हाही या फिल्मफेस्टिव्हल आयोजना मागचा उददेश असल्याचे
त्यांनी म्हटले आहे. आगामी वर्षापासून या चित्रपट महोत्सवाला जोडून
कलाकार घडवण्याच्या वेगवेगळया कार्यशाळा आयोजित केल्या जातील अशी घोषणा
जब्बार पटेल यांनी यावेळी केली.

चित्रपट महोत्सव आणि लातूरचे नाते जवळचे आहे असे सांगतांना तत्कालीन
मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी या उपक्रमासासाठी मोठी मदत
केली असल्याचे सांगून त्यांच्या अनेक आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या.
विलासरावाच्या मनाचे मोठेपण त्यांच्या तीन्ही पुत्रांमध्ये आहे असे
सांगून आज अमित देशमुख यांच्यामुळे लातूरात आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सव होत असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरचे रितेश विलासराव देशमुख
आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकार झाले असले तरी त्यांनी खानदानी विनम्रपणा
आणि प्रमाणिकपणा सोडलेला नाही असे आवर्जून जब्बार पटेल यांनी यावेळी
सांगितले.

यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की, आज हा चित्रपट महोत्सव होत
आहे या वेळी मला आवर्जून आठवण येते, ती लोकनेते विलासराव देशमुख साहेब
यांची ‘जे जे नवं ते ते लातूरला हव’ असा त्याचा कायम ध्यास असायचा.
त्यांची परंपरा पूढे अमित देशमुख चालवत आहेत याचा लातूरकर म्हणून मलाही
आनंद आणि अभिमान आहे. लातरला विविध क्षेत्रात पूढे घेऊन जाण्यासाठी आणखीन
जे जे करणे शक्य आहे ते ते केले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.एस.वाकुरे यांनी केले तर शेवटी
आभार अभिजात फिल्म सोसायटीचे सचिव श्यामजी जैन यांनी मानले. अध्यक्ष
जितेद्र पाटील यांनी या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाची
ओळख करून दिली. भारती गोवंडे यांनी सुत्रसंचालन केले.



चौकट

लातूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राज्याचे
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, लातूर जिल्हयाचे पालकमंत्री
गिरीश महाजन तसेच लातूरचे खासदार सुधाकर श्रृगारे यांनी पाटवलेल्या
शुभसंदेशाचे या संमारंभ वाचन करण्यात आले.

सदरील चित्रपट महोत्सव ३ दिवस चालणार आहे. मराठवाड्यात औरंगाबादेनंतर
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळाला आहे.
प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप
प्रज्वलनानंतर कान फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार
मिळालेला आणि ऑस्करच्या प्राथमिक फेरीत दाखल स्वीडिश दिग्दर्शक तारीक
सालेह यांचा 'बॉय फ्रॉम हेवन' हा चित्रपट दाखवून महोत्सवाचा प्रारंभ
करण्यात आला.

उदघाटन कार्यक्रमाच्या दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या फिल्म फेस्टिवल मध्ये
कविता दातीर व अमित सोनावणे दिग्दर्शित 'गिरकी', मयूर करंबळीकर
दिग्दर्शित 'डायरी ऑफ विनायक पंडित' व अनिल साळवे दिग्दर्शित 'ग्लोबल
आडगाव'हे तीन मराठी चित्रपट चित्रपट रसिकांना दाखवले जातील. या
फेस्टिवलमध्ये मराठी शिवाय भारतीय भाषा विभागातील इतर भारतीय भाषेतील तीन
चित्रपट आहेत. यामध्ये - 'बॅक टू फ्युचर' (डॉक्यूमेंटरी - दिग्दर्शक
मनोहर बिश्त), 'द स्टार इज मूवींग' (तमिळ -दिग्दर्शक - पा. रंजित), 'सोल
ऑफ सायलेन्स' (असामी - दिग्दर्शक - धनजित दास) दाखविण्यात येणार आहेत.
जागतिक विभागातील चित्रपटमध्ये `जागतिक विभागात (वर्ल्ड सिनेमा) 'द केस'
(दिग्दर्शक- नीना गौसेवा, रशिया), 'सोन्ने' (दिग्दर्शक-कुर्दवीन आयुब,
ऑस्ट्रिया), 'लैलाज ब्रदर्स' (दिग्दर्शक- सईद रौसोई, इराण) 'द चॅनेल'
(दिग्दर्शक - थाएरी बिन्श्ती, फ्रान्स, बेल्जियम), 'लायरा' (दिग्दर्शक
-एलिसन मिलर, आयर्लंड, युके) 'हबीब' (दिग्दर्शक - बेनोत मारी,
बेल्जियम,फ्रान्स), 'डायव्हरटीमेंटो' (दिग्दर्शक - मारी कैसल, फ्रान्स),
'रिच्यूअल' (दिग्दर्शक - हँन्स हर्वोस, बेल्जियम, जर्मनी)
'ब्रोकर'(दिग्दर्शक- हीरोक्जू कोरीदा, दक्षिण कोरिया) विविध भाषेतील हे
चित्रपट इंग्रजी सब टायटलसह असणार आहेत.
Previous Post Next Post