गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पिवळया पट्टीच्या आत मध्ये लावणार्या गाडीला लावले जात आहेत जामर
लातूर मध्ये गजब प्रकार;पैशासाठी वाटेल ते..!
लातूर येथील महानगरपालिकेकडून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी अवैध पार्किंग करणार्या नागरिकांच्या वाहनांना जामर लावून दंडाची वसूली करण्याचे काम सक्तीने केले जात आहे. हे काम मनपा कर्मचारी करीत नाहीत. तर याचे कंत्राट एका शहरातील व्यक्तीला देण्यात आलेले आहे. परंतु त्या व्यक्तीकडून रितसर प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नगरिकांना दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.परंतू आता तर कहर झाला असुन चक्क पिवळयापट्टीत पार्किंग केलेल्या एका गाडीला चक्क जामर लावला असल्याचा धक्कादायक प्रकार गुरवार दि ३०मार्च रोजी सुभाष चौक परिसरात समोर आला आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी ना गाडी मालक होता ना टोईंग कर्मचारी.हे लोक पैशासाठी वाटेल ते...!करत असल्याचे यावरून आता स्पष्ट दिसत आहे.
लातूर महानगरपालिकेने पोलिस प्रशासनाची मदत घेवून शहर वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे असते. परंतु मनपाच्या निष्क्रियपणामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे शक्त होत नाही. परिणामी शहरात जागोजागी वाहतुकीचा बेशिस्तपणा समोर येत आहे. यावर तोडगा म्हणून लातूर महानगरपालिकेने शहरातील बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी खाजगी कंत्राटदाराला दिली असल्यामुळे कंत्राटदाराकडून पार्किंगला शिस्त लावण्याऐवजी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचे काम केले जात आहे.यावर आता आयुक्त साहेबांनी वेळीच लक्ष घालून कंत्राटदारावर कार्यवाही करावी व अशा जनतेची लुट करणार्या कंत्राटदाराला काळयायादीत टाकून त्याचे कंत्राट रद्द करावे अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे