Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

समन्स बजावण्यात किल्लारी पोलीस स्टेशन लातुर जिल्हयात प्रथम

समन्स बजावण्यात किल्लारी पोलीस स्टेशन लातुर जिल्हयात प्रथम 
 पोलीस निरीक्षक एन डी लिंगे यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान



बाबूराव बोरोळे
शिरूर अनंतपाळ/उदगीर प्रतिनिधी 

 लातूर जिल्हा पोलीस दलात समन्स बजावणी मध्ये किल्लारी पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन डी लिंगे यांनी समन्सची 100% बजावणी करून लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमय मुंडे सर, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे सर यांनी अभिनंदन केले असून डीवायएसपी औसा श्री मधुकर पवार सर यांच्या शुभहस्ते सपोनी लिंगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन आज सन्मान करण्यात आलेला आहे समन्स बजावणे करणारे पोलीस हवालदार तुकाराम चव्हाण यांनाही प्रशस्तीपत्र देण्यात आलेले आहे कोर्टात केसची सुनावणी चालू झाल्यानंतर फिर्यादी, महत्त्वाचे साक्षीदार, तसेच आरोपी यांना कोर्टात हजर राहण्यासाठी माननीय न्यायालयाकडून समन्स निर्गमित केले जातात त्याची वेळेत बजावणी करणे महत्त्वाचे असते त्याचे महत्त्व ओळखून वेळेत बजावणीची कामगिरी पोलीस स्टेशन किल्लारी यांनी केलेली आहे
Previous Post Next Post