Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भारताच्या स्वावलंबनात लातूरही आपली भूमिका बजावते आहे

भारताच्या स्वावलंबनात लातूरही आपली भूमिका बजावते आहे 
                                     -
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटने लातूरकरांमध्ये उत्साह 



     --( लातूर-प्रतिनिधी )
                                      भारत वेगाने स्वालंबनाकडे वाटचाल करीत आहे आणि लातूरही यात आपली भूमिका बजावत आहे असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने लातूरकरांचा विकासाप्रती असलेला उत्साह वाढला आहे . खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून १२० वंदे भारत रेल्वेची लातूरमध्ये निर्मित होणार असे ट्विट केले होते . यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत प्रतिक्रिया दिली आहे . 
                                  मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लवकर सुरुवात व्हावा आणि या कारखान्याच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात यावे अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केन्द्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे . खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर लोकसभा मतदार संघासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकास योजना आणल्या आहेत . लातूर देशातील महामार्गांच्या प्रवाहात आले आहे . मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे तर वंदे भारत रेल्वेच्या निर्मितीमध्ये लातूरचे योगदान मिळते आहे . वंदे भारत रेल्वे हा भारत सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे . पहिल्या टप्प्यातील २०० वंदे भारत रेल्वे गाड्या पैकी १२०रेल्वे ह्या लातूरमध्ये उत्पादित होणार आहेत . त्यामुळे लातूरचे देशाच्या विकासात योगदान असणार आहे . 
                                   मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे लातूरसह मराठवाड्यातील रोजगाराचा अनुशेष भरून निघेल अशी अपेक्षा आहे . त्यामुळे खासदार सुधाकर शृंगारे यांनी स्थानिकांना नोकरीत ७० टक्के संधी द्या अशी मागणी केलेली आहे . या मागणीला रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे . आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या ट्विटला लक्षात घेऊन लातूरच्या योगदानाबद्दल ट्विट केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लातूरवर विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना हा लातूरसाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरणार आहे . खासदार सुधाकर शृंगारे हे स्थानिक विकास निधी खर्च करण्यात आणि विकासकांच्या बाबतीत मराठवाड्यातल्या लोप्रतिनिधींमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत . त्यामुळे खासदार सुधाकर शृंगारे यांचे काम बोलते आहे . या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने खासदार सुधाकर शृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत . लातूर जिल्ह्यासह लोहा, कंधारच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिलेली आहे . 
                                  Ads by Eonads
Previous Post Next Post