Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण 



बाबूराव बोरोळे
शिरूर अनंतपाळ/उदगीर प्रतिनिधी 

डिगोळ.शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. त्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगोळ येथील विद्यार्थी त्यां कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.त्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी करण्यात आले होते.
 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगोळ च्या मुख्याध्यापिका सौ. अनिता गोणे, हया होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, सरपंच सौ.कविता दासरे, उपसरपंच बाबासाहेब पाटील, बब्रुवान पाटील, महेश पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष प्रमोद बिरादार, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब बिरादार, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धनराज चावरे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मुळे ,सौ.अनिता घोणे एस.के.सुतार.श्रीमती.ए.एस.वकील.आर.एस.बिरादार. सुनिल मुळे.काळेबाग सर. डी.पी लोहार.श्रीमतीआर.जी.शिवपुजे.श्रीमती.एस.डी जाधव.श्रीमती. व्हि.एस.गिरी. आदी शिक्षक व राम बिरादार, शिवहार कोटे, शुभम पाटील, मनोज स्वामी,राहूल कांबळे, शंकर बिरादार, पांडुरंग दैठणे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के. सुतार यांनी केले तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक रामेश्वर चावरे, आभार प्रदर्शन भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस जनक बिरादार यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post