गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
सक्तीच्या ई-फायलिंगला लातूर जिल्हा वकील मंडळाचा कडाडुन विरोध अंदोलनास सर्व वकीलांचा उत्सफुर्त पाठिंबा
लातूर- मा. सर्वाच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने तालुका व जिल्हा न्यायालयात ई-फायलिंगची सक्ती केल्यामुळे केवळ वकील वर्गातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेत सु़द्धा निषेधाचा सुर निर्माण झाला आहे. प्रमुख्याने तालुका स्तरावर वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा ई-फायलिंगसाठी गरजेचे असणारे नेटवर्क ऐवढेच नाही तर ई-फायलिंगसाठी आवश्यक आसणा-या भौतिक सुविधाचा आणि तंज्ञ कर्मचा-याचा व तज्ञ न्यायाधिशांचा अभाव ही वस्तुस्थिती असताना ई- फायलिंगसाठी केलेली सक्ती ही तुघलकी निर्णय असुन ई-फायलिंग ही त्रासदायक, खर्चीक, सर्वसामान्यास न परवडणारी तसेच तात्काळ निर्णयास मारक ठरणारी यंत्रणा आहे. या विरोधात महाराष्ट्र राज्य वकिल परिषदेने मा. सर्वेाच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना करण्यात आलेली सक्ती रद्द करण्यात यावी याबाबत ठोस भुमिका घेण्याचे गरजेचे होते. असे असताना दिवसेनदिवस नवीन परिपत्रके उच्च न्यायालयाच्या वतीने काढली जातात आणि सक्ती बाबत वकिल वर्गास वेठीस धरण्यात येते. म्हणुन सक्तीची ई-फायलिंग रद्द व्हावी यासाठी लातूर जिल्हा वकिल मंडळाने जिल्हा न्यायालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. व धरणे आंदोलनास सर्व वकिलांनी उत्सफुर्त पाठिंबा दिला. या आंदोलनात प्रमुख्याने लातूर जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड. विठ्ठलराव देशपाडे, अॅड. दिपक माने, अॅड. खलील शेख, अॅड. धोंड, अॅड. महेश बामणकर, अॅड. व्ही. डी. चिखलीकर, अॅड. विजय जाधव, अॅड.रमेश खाडप, अॅड. पांडुरंग अदुडे, अॅड. गोंविद शिरसाठ, अॅड. प्रेमानंद देडे, अॅड. बशीर शेख, अॅड. प्रदिप पाटिल अॅड. वसंत उगले, अॅड. मधुकर राजमाने, अॅड. बळवंतराव जाधव, अॅड. अशिष बाजपाई, अॅड.सुनंदा इंगळे, अॅड. के. जी. देशपांडे, अॅड. उदय गवारे, अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. कालिदास देशपांडे, अॅड. आण्णाराव पाटील, अॅड. विठ्ठलराव देशपाडे, या सर्वांनी ई-फायलिंग बाबत कडाडुन विरोध व आपल्या भावना व्यक्त केल्या. धरने आदोलंनाचा समारोप लातूर जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड. विठ्ठलरावजी देशपाडे यांनी केले व ई-फायलिंगच्या सक्तीला विरोध दर्शवला.तसेच धरने अांदोलन यशस्वी करण्यासाठी वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड. विठ्ठलरावजी देशपाडे, तसेच मंडळाचे पदअधिकारी अॅड. संगीता इंगळे, अॅड. दिपक माने, अॅड. खलील शेख, अॅड. अश्वीन जाधव व वकिल मंडळातील सर्व सदस्य यांनी विशेष परिक्षम घेतले.