Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

एका "टेबलासाठी"ट्राफिक पोलिस झाले लाचार...!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
एका "टेबलासाठी"ट्राफिक पोलिस झाले लाचार...!
ट्रॅव्हल्स मालकाची..एकीकडे आड..तर दुसरीकडे विहीर..अशी अवस्था 



लातूर -
वाहतूक पोलिस दलातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे तुम्हाला कदाचित शक्य नाही. परंतु, किमान त्यावर नियंत्रण तरी मिळवा, तो कमी करण्याचा तरी प्रयत्न करा. लाचेच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही तरी व्यवस्था करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ रोजी मुंबई पोलिस दल व राज्य सरकारला एका प्रकरणात तंबी दिली होती तसेच वाहतूक पोलिसांकडून पैशांसाठी वाहनधारकांची छळवणूक होऊ नये याकरिता कोणती पावले उचलणार, याविषयी प्रतिज्ञापत्र करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते
वाहतूक पोलिस दलातच कार्यरत असलेले सुनील टोके यांनी मुंबई व पुण्यातील वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देत अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका केली होती परंतू हे सर्व कागदावरचं राहिले आहे.वास्तव परिस्थिति मात्र २०१७ ते २०२३ जैशी तेच आहे किंबहुना त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार होताना आता लपून राहिले नाही.लातूरमध्येही ट्राफिक पोलिसांकडून सर्वसामान्यांना होत असलेला त्रास वाढतच चाललेला आहे आता तर "एका टेबलासाठी ट्राफिक पोलिस लाचार ..!झाल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.
सध्या लातूर शहरामध्ये ट्राफिक ने सर्वसामान्य जनतेला हैरान करुन सोडले असून यावर नियंत्रण करण्यासाठी मा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी बर्याच उपाययोजना केल्या परंतू त्यावर काही तोडगा निघाला नाही त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी शहरातील खाजगी ट्रॅव्हल्स शहराच्या बाहेर घालण्याचा निर्णय घेतला आणि ट्रॅव्हल्स मालकांमध्ये एकच हलचल उडाली आणि मागील आठ दिवसांपासून ट्रॅव्हल्स मालक पुर्णत:हैरान झाले आहेत याचाच फायदा घेत ट्रॅफिक मधील एका अधिकार्याने "एका टेबलाची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.आता ट्रॅव्हल्स मालकाची..एकीकडे आड..तर दुसरीकडे विहीर..अशी अवस्था झाली आहे.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी घेतलेल्या निर्णयावर सर्वसामान्य जनता खुष असताना मात्र ट्रॅव्हल्स मालक अडचणीत सापडले आहेत.विशेष म्हणजे मागणी केलेला टेबल तब्बल २५०००रु चा असल्याने तो द्यायचा कोण..?यावर एकमत होत नसल्याने तो अधिकच चगळला जात आहे.आता या नविन प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या मागणीने लातूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.यावर आता मा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी वेळीच लक्ष घालून अशा भ्रष्ट अधिकार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून होवू लागली.
Previous Post Next Post