Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर शहरातील हॉटेल सिटी सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते

लातूर शहरातील हॉटेल सिटी सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते

जे जे नव ते लातूरला हव या विचाराचा धागा धरून
अग्रवाल परिवाराने मार्गक्रमण करावे









लातूर प्रतिनिधी: सोमवार दि. ६ मार्च २०२३

बदलत्या लातूरची गरज ओळखून सर्व सोयीनियुक्त शहराच्या वैभवात भर टाकणारे हॉटेल सिटी सेंटर सुरू केल्याबद्दल अग्रवाल परिवाराचे अभिनंदन करून जे जे
नव ते लातूरला हव या विचाराचा धागा धरून अग्रवाल परिवाराने मार्गक्रमण करावे असे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
म्हटले आहे.लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात नंदकिशोर अग्रवाल आणि परिवाराच्या वतीने
सुरू केलेल्या हॉटेल सिटी सेंटर लॉजिंग अँड प्युअर व्हेज रेस्टॉरंटचारेस्टॉरंटचे उद्घाटन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक
कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमितविलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. ५ मार्च रोजी सायंकाळी करण्यात
आले यावेळी ते बोलत होते.यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, टवेन्टिवन
शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, सीए प्रकाश कासट, कमलकिशोर अग्रवाल,
सागर अग्रवाल, अमित अग्रवाल, सचिन अग्रवाल, लातूर किराणा माल असोसिएशनचे
अध्यक्ष बसवराज वळसंगे, बालाप्रसाद बिदादा, मराठवाडा व्यापारी संघाचेअध्यक्ष दिनेश गिलडा, जितेंद्र स्वामी, डॉ. संतोष तोडकर आदीसह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी अग्रवाल कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हॉटेल सिटी सेंटर लॉजिंग
अँड प्युअर व्हेज रेस्टॉरंटची पाहणी करून लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी
अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त हॉटेल सिटी सेंटर उभारल्याबद्दलअग्रवाल कुटुंबीयांचे कौतुक केले. यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहरात नंदकिशोर अग्रवालपरिवाराच्या पुढाकारणे हॉटेल सिटी सेंटर हा नवा उपक्रम आपल्या सेवेमध्ये
रुजू होतोय याचा मला मनस्वी आनंद होत आहे. अग्रवाल कुटुंबीय एकाशतकापासून लातूर शहरात व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत आहेत. आगीचा
अपघात घडला त्याच जागी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त हॉटेल सिटी सेंटरअग्रवाल परिवाराने उभारले त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. लातूर
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहराची गरज ओळखून अत्यंत देखणी व्यवस्था
त्यांनी उभी केली, लातूरातील आघाडीचे रेस्टॉरंट व कॅफे हे अग्रवालपरिवाराचेच आहेत. गोलाई परिसरात एखाद्याला मुक्काम करण्याची सोयीची जागा
परवडणाऱ्या दरात येथे उपलब्ध झाली असून लातूर शहराच्या वैभवात भर टाकणाराहा उपक्रम सुरू होतोय. लातूरची संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले
आहे. लातूर शहरानजिकच्या कार्निवल रेस्टॉरंटचा शुभारंभ लोकनेते माजीमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला ते मराठवाड्यातील
अग्रगण्य रिसॉर्ट म्हणून नावारुपाला आले आहे. जे जे नव ते लातूरला हवं याविचाराचा धागा धरून अग्रवाल परिवाराने मार्गक्रमण करावे असे सांगून
त्यांनी अग्रवाल कुटुंबियांना पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर अग्रवाल यांनी करून हॉटेल सिटी
सेंटरची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली सीए प्रकाश कासट यांनी मनोगत
व्यक्त करून अग्रवाल परिवाराला पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या
शेवटी या कार्यक्रमाचे आभार पूजा महाजन यांनी मानले
Previous Post Next Post