ओबीसी समाजाचा अपमान करणार्या राहुल गांधींचा पुतळा जाळला
भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये आंदोलन
![]() |
https://youtube.com/watch?v=kcY-HR2bGtc&feature=share |
लातूर दि.24 मार्च-
मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधीचा भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात हनुमान चौक, लातूर येथे पुतळा जाळून, पुतळ्याला चप्पलने मारून राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन केले.हनुमान चौक, लातूर शहर येथे आंदोलनात उपस्थित लातूर शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे , संघटन सरचिटणीस अॅड दिग्विजय काथवटे, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत, आंदोलन प्रमुख रवी सुडे, शिवसिंह सिसोदिया, ओबिसी मोर्चा अध्यक्ष देवा गडदे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुन्ना हाशमी, महिला मोर्चा अध्यक्ष मीना भोसले, सर्व मंडल अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आदी कार्यकर्ता बंधू भगिनी उपस्थित होते..