गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अमृता फडणवीस यांना तब्बल १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. अमृता यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अनिक्षा नामक महिला डिझायनर व तिच्या वडिलांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. अमृता यांच्या तक्रारीत लाच ऑफर करण्यासह धमकी व कट-कारस्थानाचा उल्लेख आहे.