गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
Castrol कंपनीच्या ऑईलची बनावट विक्री, दोघांविरुध्द गुन्हा दाखल
कॅस्ट्रॉल ऑईल कंपनीच्या नावाने बनावट ऑईल विक्री करणार्या दोघांना लातुरात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील प्रकरणी हंबीरराव ज्ञानू साठे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे की, फिर्यादीच्या कंपनीला कॉपीराईट संदर्भात स्वामित्व अधिकार देण्यात आलेले आहेत. कॅस्ट्रॉल ऑईल या नावाने मूळ कंपनीचा होलोग्राम मोनोग्राम वापरून बनावट ऑईल विक्री करण्यात येत होती. शिवाजी चौकातील महाराजेश्वर ऑटोमोबाईल्स व रामदेव ऑटोमोबाईल्स या दोन दुकानांमध्ये बनावट कॅस्ट्रॉल ऑईल विक्री करण्यात येत होती. याप्रकरणी दीपक शंकरलाल चौधरी आणि सुरेश खेताराम चौधरी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 93 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.