गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
कत्तल करण्याच्या हेतूने 18 गायी घेऊन जाणाऱ्या इसमास औसामध्ये अटक; टेम्पोत एका कारवडीचा मृतदेह
लातूर/औसा
कत्तलीसाठी टेम्पोमध्ये 18 गायी, बैल, कालवड भरून नेत असताना पोलिसांनी औसा येथे एक टेम्पोला अडवले टेम्पोची झडती घेतल्यानंतर त्यात 18 गायी, बैल, कालवड आढळून आल्या. त्यामध्ये एका कारवडीचा मृतदेह आढळून आला असल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी टेम्पोसह 12 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
औसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी नवनाथ नंदराम चामे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, लातूर कंट्रोल रूम येथून मिळालेल्या माहिनुसार एक टेम्पोत जनावरे नेत भरून नेण्यात येत आहेत, असे समजले. संशयित टेम्पोची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये तब्बल 18 जनावरे आढळून आली. तसेच त्यात चार वर्षांच्या एका कालवडीचा मृतदेह आढळून आला. 4 लाख 69 हजार रुपयांची जनावरे आणि आठ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 12 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून असीफ अन्वर कुरेशी (रा. आझाद चौक, निलंगा वेस, औसा) याला अटक करण्यात आली. पकडण्यात आलेली जनावरे सांभाळण्यासाठी गोरक्षणकडे देण्यात आली. या जनावरांना चारा पाणीही देण्यात आले नव्हते. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 नुसार प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.