एलटीआर सॉफ्टमधील ११ विद्यार्थ्यांनी पूर्ण केली मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप
लातूर: अंबाजोगाई रोड येथील एलटीआर सॉफ्टमधील ११ विद्यार्थ्यांनी मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. एलटीआर सॉफ्ट हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संलग्नित असून प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी विनामूल्य रजिस्ट्रेशन करून घेतले जाते. या इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी बी.ई., बीएस्सी, बी. ए., बीकॉम या पदवी अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच अंतिम वर्षात शिकणारे विध्यार्थी पात्र आहेत. मायक्रोसॉफ्ट चा हा इंटर्नशिप प्रोग्रॅम ८० दिवसाचा असून यामध्ये ओरिएंटेशन (अभिमुखता), सेल्फ लर्निंग, इंडस्ट्रियल सेशन व प्रोजेक्ट असे चार भाग आहेत. हे चारही भाग पूर्ण झाल्यावर त्याचे मूल्यमापन मायक्रोसॉफ्ट ची टीम करते. मूल्यमापन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप सर्टिफिकेट देते.
इंटर्नशिप सर्टिफिकेट मिळाल्यावर हे विध्यार्थी मुलाखतीसाठी पात्र होतात. इंटरव्ह्यू जर यशश्वीरित्या पूर्ण केला तर जॉब ची संधी मिळते. एलटीआर सॉफ्ट ने मागील तीन वर्षात प्लेसमेंट चा लातूर पॅटर्न तयार केला असून ५०० हून अधिक विध्यार्थ्यांना विप्रो, टीसीएस, कॅपजेमिनी, इन्फोसिस अश्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली आहे. तसेच एलटीआर सॉफ्ट हे मायक्रोसॉफ्ट व इसरो चे सर्टिफिकेट प्रोग्रॅम्स चालवते.
वरील सर्व पायऱ्या पार करून एलटीआर सॉफ्टमधील आदित्य शिंदे, गौस शेख, रोहित कागडे, श्रेया कुलकर्णी, किरण कडगंची, वेदांत नॊगजा, समीक्षा भुतडा, आशिष चव्हाण, श्रद्धा मोरलावार, पियुष मिनीयार व किरण काळे हे विध्यार्थी मायक्रोसॉफ्ट तर्फे होणाऱ्या इंटरव्ह्यू साठी पात्र ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे एलटीआर सॉफ्ट चे संचालक श्री किशोर जेवे व श्री. अमोल कुंभार यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.