Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर कृऊबा निवडणूकीत सुपारी देणार्‍यांना आणि घेणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देणार

लातूर कृऊबा निवडणूकीत सुपारी देणार्‍यांना
आणि घेणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देणार
आ. रमेशअप्पा कराड यांचे प्रतिपादन; १४ एप्रिलला प्रचाराचा शुभारंभ




लातूर दि.०४ – प्रत्येकवेळी बाजार समितीची निवडणूक देशमुखांनी वेगवेगळ्या चालाखीने लढवून सत्ता काबीज केली. सरळ लढत न होता तिसरा पॅनल कसा राहिल यासाठी प्रयत्न करीत राहिले. मात्र यावेळी लातूर बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपाने स्वतंत्रपणे सक्षम पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उभा केला असून या निवडणूकीत तिसर्‍या पॅनलसाठी सुपारी देणार्‍यांना आणि घेणार्‍यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले. या निवडणुकीतील भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ १४ एप्रिल शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले. 

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ईच्छुक उमेदवारांसह लातूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणी लोकप्रतिनिधीची निवडणूक आढावा आणि पुढील रुपरेषा निश्चित करण्यासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी व्यासपिठावर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, प्रदेश भाजयुमोचे बाबू खंदाडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे आणि संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाजार समिती निवडणूकीत शेतकर्‍यांना उभे राहण्याचा महत्त्वपूर्ण अधिकार शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने दिला लातूर ग्रामीणच्या काँग्रेस आमदार महोदयाने विधानभवनात भाषण ठोकून हा अधिकार मिळू नये यासाठी विरोध केला, शेतकर्‍यांच्या हिताला विरोध करणार्‍या देशमुखांच्या काँग्रेस प्रणित पॅनलला बाजार समितीच्या निवडणूकीत मतपेटीतून धडा शिकवावा असे आवाहन करून गेल्या निवडणूकीत जनतेनी आशिर्वाद दिला होता, भाजपाचे पाच निवडूण आल्याचे घोषित केले चौघांना तांत्रिक अडचण निर्माण करून न्यायालयात अडकविले, तर तीन-चार जण अवघ्या आठ-दहा मतांनी पराभूत झाले. पाच-सहा वर्षापूर्वीची परिस्थिती आज राहिली नाही. लातूर तालुक्यात भाजपाची भक्कम ताकद निर्माण झाली असून बहुतांशी ग्रामपंचायतीवर आणि सोसायटीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. त्यामूळे शंभर टक्के भाजपाच्याच पॅनलचा विजय होणार असल्याचे आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

            देशमुखांनी वर्षानूवर्ष सत्ता उपभोगली तरीही ग्रामीण भागातील अनेक गावात विकासाच्या योजना राबवू शकले नाहीत. विद्यमान काँग्रेसच्या आमदारांनी किती निधी आणला, मतदार संघासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून आपल्या सर्वांच्या मेहनतीमूळे पक्षाने मला आमदारकी दिली. या मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात प्रत्येक गावात विविध योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन अनेक विकासाची कामे मंजूर केली. त्यातील बरीच कामे आज प्रगती पथावर आहेत. असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, माझे कार्यकर्ते गरीब असतील पण तितकेच स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी मी कधीच कार्यकर्त्यांचा सौदा केला नाही आणि यापूढेही करणार नाही. या निवडणूकीत समाजातील पत आणि विश्वासआर्हता संपलेल्यांना सोबत घेण्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भुमिका घेतली आणि भाजपाचे सक्षम पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उतरविले.

            भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर १२ नंबर पाटी, लातूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून बाजार समितीच्या सर्वांगीन विकासाठी, शेतकर्‍यांचा हितासाठी आणि व्यापारी हमालांच्या संरक्षणासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल विजयी होणे गरजेचे आहे. तेंव्हा भाजपाच्या सर्व पक्ष पदाधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी आजपासूनच जिद्दीने जोमाने कामाला लागावे प्रत्येक मतदारांच्या थेट संपर्कात राहावे असे आवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.

            मतदार संघात माझे कतृत्व आहे हे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी नोटाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. मी कधीच जाती-पातीचा विचार केला नाही. त्यामूळे मागील काळात झालेल्या निवडणूकीत तब्बल ९२ हजार मतदारांनी आशिर्वाद दिला होता याची आठवण करून देवून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, गेल्या निवडणूकीत आईला विकत घेतले नसते तर देशमुखांचा किमान ४० हजार मतांनी पराभव केला असता. मात्र येणार्‍या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत कमीत-कमी सव्वा लाख मते भाजपाला घेतल्याशिवाय राहणार नाही असे बोलून दाखविले.

            या बैठकीत प्रदिप पाटील खंडापूरकर, विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, बाबू खंदाडे, संतोष शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून देशमुखशाही संपविण्यासाठी स्वत:ची निवडणुक समजून प्रत्येकांनी काम करावे आणि आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या पॅनलच्या विजयासाठी मेहनत घ्यावी. तिसर्‍या पॅनलला मतदार कवडीची किंमत देणार नाहीत असे बोलून दाखविले. बैठकीचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.

            या बैठकीस भाजपाचे नेते राजेश कराड, चंद्रसेनाना लोंढे, विजय काळे, गोविंद नरहारे, विष्णुदास मोहिते, वैभव सापसोड, सुरज शिंदे, विशाल शिंगडे, अ‍ॅड. धनराज शिंदे, भैरवनाथ पिसाळ, सुधाकर गवळी, चंद्रकांत वांगस्कर, अशोक बिराजदार, विजयकुमार मलवाडे, महेश कणसे, बालाजी दुटाळ, वैजनाथ लवटे, पांडुरंग शिंदे, अरविंद सुरकुटे, रुपेश काळे, गोपाळ पाटील, मारुती शिंदे, पद्माकर होळकर, अच्युत भोसले, विनायक मगर, शंकर चव्हाण, ज्ञानेश्वर जुगल, दिपक वांगस्कर, अशोक सावंत, बाबासाहेब भिसे, संजय ठाकूर, प्रताप पाटील, लक्ष्मण नागीमे, समाधान कदम, धनंजय जाधव, अहमद शेख, पुंडलिक बेंबडे, राम बंडापल्ले, सचिन साबदे, लक्ष्मण मुळे, बाबा कदम, सचिन लटपटे, शरद शिंदे, विठ्ठल बोजे, रशिद पठाण, योगिराज साखरे, ईश्वर बुलबुले, प्रशांत शिंदे, रवि माकुडे, लहुराजे सव्वासे, बालाजी नाईकवाडे, शुभम खोसे, किशोर काटे, सुरेश पाटील, बालाजी गवळी, पप्पु घुटे यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post