Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

घनसरगाव-चुकारवाडी पानगाव रस्त्यासाठीआ.कराड यांना विविध गावचे आग्रही साकडे

घनसरगाव-चुकारवाडी पानगाव रस्त्यासाठीआ.कराड यांना विविध गावचे आग्रही साकडे





          लातूर दि.१५ - पानगाव ते खरोळा फाट्यापर्यंतच्‍या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तीन चार वर्षापासून होत नसल्याने घनसरगाव - चुकारवाडी मार्गे पानगाव हा पर्यायी रस्ता तात्काळ करण्यात यावा अशी आग्रहाची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांना घनसरगाव, चुकारवाडी, पाथरवाडी, पानगाव, गोविंदनगर, भंडारवाडी, नरवटवाडी, फावडेवाडी आदी गावच्या सरपंच, चेअरमनसह विविध लोकप्रतिनिधींनी निवेदनाद्वारे केली. पानगावच्‍या या पर्यायी रस्त्याच्या कामासाठी निश्चितचपणे शासन दरबारी तातडीने प्रयत्न करून लवकरात लवकर काम सुरू होईल अशी ग्वाही आ. कराड यांनी यावेळी दिली.

            लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आ. रमेशअप्पा कराड यांची पानगाव- घनसरगाव परिसरातील विविध गावच्या नागरिकांनी गावा-गावातील विविध विकासकामासह पानगाव रस्त्याच्या प्रश्नाची कैफियत मांडली. यावेळी भाजपाचे तालुकाध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे, संगायोचे अध्‍यक्ष वसंत करमुडे, भाजपाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष सतिष अंबेकर, महेंद्र गोडभरले, पाथरवाडी-चुकारवाडीचे सरपंच रामभाऊ बडे, घनसरगावच्‍या सरपंच सौ. महानंदा दरेकर, गोविंदनगरच्‍या सरपंच सौ. निता शिंदे, यशवंतवाडीचे सरपंच ओम चव्‍हाण, भागवत गिते, सुकेश भंडारे, शरद दरेकर, सौ. शिला आचार्य यांच्‍यासह विविध गावचे सरपंच, चेअरमन, विविध लोकप्रतिनीधी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रेणापूरहून पानगाव जाण्यासाठी खरोळा फाटामार्गे जूना रस्ता आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काहींनी आडवा-आडवीचा प्रकार केल्याने सदरील रस्त्याचे काम अद्याप होऊ शकले नाही यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून वाहनधारकासह सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पानगाव ते खरोळा फाटा रस्ता जीवघेणा बनला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो तर दैनंदिन प्रवास करणारे तर वैतागले आहेत. तेव्हा या रस्त्याची आशा सोडून घनसरगाव - चुकारवाडी मार्गे पानगाव हा पर्यायी रस्ता तात्काळ करण्यात यावा अशी आग्रहाची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्‍याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. त्‍याचबरोबर गोविंदनगर येथे स्‍मशानभूमी, आरोग्‍य उपकेंद्र मंजूर करावे, पाथरवाडी-गोविंदनगर- यशवंतवाडी रस्‍त्‍याचे काम व्‍हावे, पाथरवाडी हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधण्‍यात यावे, घनसरगाव येथे स्‍मशानभूमी मंजूर करावी यासह विविध मागण्‍यांचे निवेदने त्‍या-त्‍या गावातील नागरीकांच्‍या वतीने देण्‍यात आले.

विविध गावच्‍या शिष्‍टमंडळाशी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड यांनी विविध गावातील विकास कामासाठी आचार संहिता संपल्‍यानंतर आमदार निधी आणि शासनाच्‍या विविध योजनेतून निधी उपलब्‍ध करून दिला जाईल असे सांगून रेणापूर-पानगाव महामार्ग रस्त्याला घनसरगाव चुकारवाडी मार्गे पानगाव हा पर्यायी रस्ता मंजूर झाल्यास प्रवासाचे अंतर कमी होवून वेळेची बचत होणार आहे. त्यामूळे निश्चितच शासन दरबारी पर्यायी रस्त्यासाठी प्रयत्न करू सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु होईल अशी ग्वाही दिली. 

यावेळी चेअरमन व्यंकटेश सुडे, पुंडलिक सुडे, गणपत चव्हाण, प्रभाकर चव्हाण, अशिष चव्हाण, भरत कापसे, साहेबराव शिंदे, भानूदास केदार, भागवत बडे, देविदास वीरकर, भाऊसाहेब शिंदे, केशरबाई अहिलवाड, जाकीराबी पठाण, अंगद गुडे, रामदास बडे, परिक्षित सुडे, रंगराव ठाकूर, अशोक शिंदे, विश्वनाथ गाडे, शिवाजी उपाडे, शिवाजी शिंदे, आबासाहेब चव्हाण, बालासाहेब जाधव, पंडित शिंदे, प्रताप चव्हाण, अंगद चव्हाण, महेश चव्हाव, रामराव शिंदे, दगडु इंगोले, अ‍ॅड. माधव गुडे, सुधाकर दहिफळे, सुधाकर फुले यांच्यासह घनसरगाव, चुकारवाडी, पाथरवाडी, पानगाव, गोविंदनगर, भंडारवाडी, नरवटवाडी, फावडेवाडी आदी गावचे सरपंच, चेअरमन, सदस्यांसह विविध लोकप्रतिनिधी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
Previous Post Next Post