कॉग्रेस विरोधी लढयात सर्वजण एकत्रित या-माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर
अजित पाटील कव्हेकर यांच्या पुढकारातून लातूर बाजार समितीत भाजपाचे एकच पॅनल
लातूर प्रतिनिधी:- राज्यात बाजार समिती निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे.राज्यात नावाजलेल्या लातूर बाजार समितीत आजपर्यंत कॉंग्रेसने केवळ स्वताच्या हिताचा विचार करून कारभार केलेला आहे. आता होवू घातलेल्या निवडणुकीत शेतकरी, व्यापारी व कष्टकरी यांनी कॉंग्रेसचा पराभव करण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळेच बाजार समितीच्या या निवडणुकीत कॉग्रेस विरोधी लढयात सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन करून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पाटील कव्हेकरांच्या पुढाकारातून भाजपचे एकच पॅनल असेल अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे.
लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत कॉग्रेसच्या विरोधात भाजपचे दोन पॅनल निवडणुक लढवत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे कॉग्रेसला त्याचा फायदा होवून या निवडणुकीत त्यांचा विजय सहज शक्य झाला असता भाजपच्या दोन पॅनलमुळे कॉग्रेस विरोधी ताकदीचे विभाजन होवून भाजप पक्षाला धोका निर्माण झाला असता. सदर बाब लक्षात घेवूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून अजित पाटील कव्हेकर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपचे एकच पॅनल असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार अजित पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे एकच पॅनल निवडणुक रिंगणात राहणार असल्याची माहिती माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकारांना दिली. कॉंग्रेसच्या पराभवासाठी निवडणुक लढयात सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले आहे.
आगामी होवू घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या कारभाराला शेतकरी, व्यापारी व कष्टकरी कंटाळलेला असल्याने त्यांनी कॉंग्रेसचा पराभव करण्याचे निश्चित केलेले आहे. शेतकरी, व्यापारीव कष्टकरी यांच्यासह सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी भाजपा नेहमीच बांधील असल्याचे सांगून माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठीच अजित पाटील कव्हेकर यांनी ही भूमिका घेतली असल्याचे सांगितले. भाजपाच्या दोन पॅनलमुळे कॉग्रेस विरोधी ताकदीचे विभाजन होवून त्याचा फायदा कॉंग्रेसला होवू नये अशी अपेक्षा अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली होती. त्यानुसारच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आलेली होती. या चर्चाअंती कॉंग्रेसचा पराभव हेच उदिष्ट भाजपचे असल्यामुळे पक्षहितासाठी अजित पाटील कव्हेकर यांनी व त्यांच्या समर्थकांनी भाजपचे एकच पॅनल या निवडणुकीत कॉंग्रेस विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पाटील कव्हेकर यांची ही भूमिका संघटनेच्या हिताची आहे. त्यामुळेच आता बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून लढा दयावा असे आवाहन करून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजयुमो शहर जिल्हयाचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, संघटन सरचिटणीस अॅड.दिग्विजय काथवटे, सरचिटणीस प्रविण सावंत, दिनकर पाटील, अजय दुडिले, नितीन कोरे, सुर्यकांत शेळके, निळकंठ पवार, धीरज पाटील, महादेव गायकवाड, बाबासाहेब देशमुख, सिदाजी माने, तानाजी झुंजे, नरसिंग इंगळे, किशारे घार, धनंजय बाचपल्ले, नेताजी लोमटे, राजाभाऊ वैदय, बब्रुवान पवार, अंगद जाधव, अरूण लांडगे वीर युवराज, महादेव आरगडे, नागेश वाघमारे आदीची उपस्थिती होती