Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
.....................................

भारत जाधव -उपाध्यक्ष 

विठ्ठल तगलपल्लेवार-उपआध्यक्ष 

कार्याध्यक्षपदी जाफर अहमद पटेल

सरचिटणीसपदी बाबुराव बोरोळे


लातूर / प्रतिनिधी
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विभागाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर यांनी जाहीर केली आहे.
साप्ताहिक विभागाच्या या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी भारत जाधव व विठ्ठल तगलपल्लेवार, कार्याध्यक्षपदी जाफर अहमद पटेलकार्याध्यक्षपदी जाफर अहमद पटेल, सरचिटणीसपदी बाबुराव बोरोळे, कार्यवाहक पदी शेख, संघटकपदी दिगंबर तारे तर सदस्य म्हणून नितीन चाळक यांची निवड करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने व साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष बालाजी फड व साप्ताहिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस वामन पाठक यांच्या सूचनेवरून साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या निवडीचे स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फड, सरचिटणीस संगम कोटलवार, कार्याध्यक्ष शहाजी पवार व सुशांत सांगवे, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सितम सोनवणे व जिल्ह्यातील पत्रकारांनी केले आहे.

Previous Post Next Post