गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये दिवसाढवळया चालत असलेला कत्तलखाना..
दाखविणाऱ्या दोघांना बेदम मारहाण गांधी चौक पोलिसांत १८ जणांवर गुन्हा; १० जणांना अटक
लातूर: गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून पोलिसांना सोबत घेऊन कत्तलखाना दाखविणाऱ्या विश्व हिंदू महासंघाच्या दोघा पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २४) सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास शहरातील कुरेशी मोहल्यात घडली.घटनेनंतर बराच वेळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे वा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या संदर्भात गांधी चौक पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहारातील गांधी चौक पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या कुरेशी मोहल्यात कत्तलखाना असून येथील कत्तलखान्यामध्ये गायी कापल्या जात असल्याची माहिमी मिळाल्यावरुन विश्व हिंदू महासंघाचे पदाधिकारी अजय लक्ष्मण चामले व सूर्यासिंग राजपूत हे दोघे गांधी चौक पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली आणि जेथे गायींची कत्तल होत आहे तो कत्तलखाना दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन कुरेशी मोहल्ला येथे घेऊन गेले. या परिसरात पोहोचल्यानंतर एका घरात सुरू असलेला कत्तलखाना त्यांनी पोलिसांना दाखविला. पोलीस या कत्तलखान्याची पाहणी करीत असताना येथे जमलेल्या शेख असिफ रोक, मुनीर बशीर कुरेशी, कलीम मोहम्मद कुरेशी
अधिक अफसर कुरेशी, सुफियान अब्दुल रजाक कुरेशी इस्माईल अब्दुल रशीद कुरेशी, इसाक रशीदनीय कुरेशी, एजाज मेहताब कुरेशी, मुनाफ बशीर कुरेशी, मोहम्मद आरिफ हुसेन कुरेशी, अश्फाक कुरेशी, फय्युम कुरेशी, मंजूर कुरेशी व इतर अनोळखी ४-५ (सर्व रा. लातूर) यांनी या दोघांना, तू आमच्या कत्तलखान्याची माहिती पोलिसांना देतोस का, असे म्हणत बेदम मारहाण केली. यात गंभीर गुन्हा जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या संदर्भात अजय लक्ष्मण चामले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गांधी चौक पोलिसांत वरील आरोपींविरोधात गुरनं गुरनं. २१३ / २३ कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२९, ३३७ भादंवि व ५, ५(ब), ५ (क), ९. ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित गोहत्या अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे...