Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रयागराजमध्ये कुख्यात माफिया अंतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
प्रयागराजमध्ये कुख्यात माफिया अंतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या




वैद्यकीय तपासणीसाठी उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया आणि माजी खासदार अंतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना या दोघांची शनिवारी प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक हल्लेखोरांना पकडले.
दोन दिवसांपूर्वीच अतिक याचा मुलगा असद त्याच्या साथीदारासह पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला असून, अतिकच्या हत्येने चार दशकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माफिया राजकारण्याचा अंत झाला आहे. ज्या प्रयागराजमधून त्याच्या गुन्हेगारीची सुरुवात झाली तेथेच तो मारला गेला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस त्यांना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेले होते. या महाविद्यालयाजवळच त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. त्यांना दहाहून अधिक गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले.अतिक अहमदला अलीकडेच गुजरातमधील तुरुंगातून उत्तर प्रदेशात आणण्यात आले होते. एका कृषि संस्थेच्या प्राध्यापकावर हल्ला केल्याप्रकरणी त्याला २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या माफियाला २०१९ मध्ये गुजरातमधील तुरूंगात हलविण्यात आले होते.

६० वर्षीय अतिक अहमदच्या गुन्हेगारीची सुरुवात प्रयागराजमधूनच झाली होती. १९८४ साली त्याच्यावर येथे खुनाच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पाच वर्षांतच तो अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आला. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची पाठशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात त्याची राजकीय कारकीर्द फुलत गेली. समाजवादी पार्टीने त्यालानंतर पावन करून घेतले. १९९५मंत्रवती या एका गेस्ट हाऊसमध्ये आपल्या आमदारासोबत थाबल्या असताना अवि मद आणि माच्या या गेस्टहाऊसवर गोळीबार केला होता. १९९६ साली अतिक स्पाकडून आनदार म्हणून निव आला. यानंतर त्याने अपना दलात प्रवेश केला. २००४ फुलपूर लोकसभा मतदारसंघातून सगाच्या तिकिटावर निवडून आला.

हुजन समाजाच्या राजू पाना आमदाराच्या हत्येने तिच्या अपराधांचा घडा भरला. पाच प्रकरणातील एका साक्षीदाराच्या त्याप्रकरणात आरोपी असलेल्या त्याच्या मुलगा गुरुवारी पोलिसांनी चकमकीत संपविले आणि शनिवारी या आतंकाचा शेवट झाला
Previous Post Next Post