गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पार्किंगच्या जागेत बांधलेल्या दुकानांना ठोकले सील
मनपाच्या पथकाची कारवाई
लातूर/प्रतिनिधी: अपार्टमेंट मध्ये पार्किंगसाठी सोडलेल्या जागेत अनधिकृतपणे बांधलेल्या दुकानांना मनपाच्या पथकाने सील ठोकले.मनपा आयुक्तांच्या सूचना व नगर रचनाकरांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
अपार्टमेंटमधील नागरिकांना पार्किंगसाठी जागा सोडण्यात आलेली असते परंतु नितीन केशवलाल शहा यांनी या जागेचा अनधिकृतपणे व्यावसायिक वापर केल्याचे निदर्शनास आले.शहा यांनी पार्किंगच्या जागेत तीन दुकाने बांधलेली दिसून आली. नियमांचा भंग झाल्यामुळे या दुकानांना सील ठोकण्यात आले.
या कारवाईत मनपाचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे,कर निरीक्षक शेख तहेमीद,स्वच्छता निरीक्षक शेख आक्रम,देवेंद्र कांबळे, कनिष्ठ अभियंता सौ.नौशाद शेख, गफार इनामदार,भालचंद्र कांबळे,संतोष ठाकूर,अशोक पवार,रहीम शेख,दत्ता गंगथडे,महादेव बेलकुंदे,किशोर भालेराव,महादू पवार,समीर शेख,महेबूब शेख,जावेद शेख,दत्ता कदम,मुस्तफा शेख,मैनोद्दीन शेख यांनी सहभाग घेतला.