गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गाव भागातील अवैध कत्तलखाना सील
महानगरपालिका व पोलिस प्रशाशनाची कार्यवाही
लातूर: अवैध कत्तलखाना असल्याच्या संशयावरून पोलिसांना सोबत घेऊन कत्तलखाना दाखविणाऱ्या विश्व हिंदू महासंघाच्या दोघा पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २४) सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास शहरातील कुरेशी मोहल्यात घडली होती.या घटनेनंतर बराच वेळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे वा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्यानंतर हिंदुत्वादी संघटना एकत्र येवून गावभागात मनपाच्या जागेत जे काही कत्तलखाने चालू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावेत. येथे हिंदुचे दैवत गोवंश सर्रास कापले जातात. काल दि. २४/०४/२०२३ रोजी पोलीस प्रशासना सोबत गेलेल्या गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आणि गावभागात राहणा-या सर्वांनाच त्या कत्तलखान्यांचा सारखाच त्रास आहे. जसे दुर्गंध, रोगराई, असंख्य कुत्रे तसेच नालीमधून वर्षाचे बास महिने रक्त वाहते अशा अनेक समस्यांना गावभाग वर्षानुवर्षे तोंड देत आलेला आहे. पण आता गावभागातील जनता गप्प नाही बसणार. ते अनाधिकृत कत्तलखाने दि. २९/०४/२०२३ पर्यंत बंद करण्यात यावेत. अन्यथा सर्व हिंदुत्वादी संघटना मिळुन तीव्र आंदोलन करतील. तसेच संपूर्ण लातूर बंदची हाक देण्यात येईल. दरम्यान लाक्षणिक उपोषण करण्यात येईल व इतर साखळी आंदोलने करण्यात येतील असे निवेदन महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले होते.त्यानंतर कायदा सुवव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींना पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक श्री गजानन भातलवंडे यांच्या मदतीने चाकुर डि वाय एस पी निकेतन कदम यांनी विवेकानंद पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या मदतीने बोलावून बैठका घेण्यात आल्या या बैठकीमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्यात येणार असल्याचे सांगुन दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींना कायदा सुवव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले त्यानंतर या घटनेचे गंभीर दखल घेवून माननिय आयुक्त यांनी एक पथक तयार करुन गांधीचौक पोलिसांच्या मदतीने महानगरपालिका अधिकारी बंडु किसवे, अधिकारी बंटी राजुरे गांधी चौक पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक माकोडे व ईतर कर्मचारी यांनी हा दिवसा ढवळया चालू असलेला कत्तलखाना सील करण्यात आला असुन पुढील कार्यवाही माहनगरपालिका आणि पोलिस प्रशासन करत आहेत.