Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ. अरविंद भातांब्रे यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित


 प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ. अरविंद भातांब्रे यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित 
महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा पुतळा न हटविण्याबाबत
------------------------------------------------------------------



लातूर : लातूर शहरातील कव्हा नाका , महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी सुरु केलेले आमरण उपोषण अक्षयतृतीयेच्या दिवशी प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. 
                 कोरणेश्वर आप्पाजी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. भातांब्रे व त्यांच्या अनुयायांनी कु. वेदिका लद्दे , कु. अवंती झुरळे, कु. अक्षता भातांब्रे, आदिराज झुरळे या बालकांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन डॉ. भातांब्रे यांनी आपले उपोषण सोडले. लातूर शहरातील कव्हा नाका , महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्याचा घाट घालण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या नावाखाली हा प्रकार घडविला जाणार होता. महात्मा बसवेश्वर हे केवळ लिंगायत धर्मियांचेच श्रद्धास्थान नसून ते समस्त बहुजनांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे हा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये, या मागणीसाठी डॉ. अरविंद भातांब्रे, बसवप्रेमी लक्ष्मण मुखडे, विवेकानंद विश्वनाथ स्वामी, आनंद जीवणे यांनीही बुधवार, दि. १९ एप्रिल २०२३ पासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. या आमरण उपोषणास प्रत्येक पक्ष, राज्यातील आणि जिल्ह्यातील संघटनांनीही आपला पाठिंबा जाहीर केला होता. डॉ. भातांब्रे यांनी जोपर्यंत प्रशासनाकडून हा पुतळा हटविला जाणार नाही,असे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी उपोषण सोडावे अशी विनंती प्रशासनाकडूनही वेळोवेळी केली गेली. मात्र, डॉ.अरविंद भातांब्रे आपल्या निर्धारापासून जराही ढळले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध लोकप्रतिनिधींशी याविषयी चर्चा करून तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकारी , मनपा प्रशासनाचा समन्वय घडवून हा पुतळा हटविण्यात येणार नसल्याचे लेखी पत्र डॉ. भातांब्रे यांच्या सुपूर्द केल्यानंतर डॉ. भातांब्रे यांनी उपोषण कृती समितीशी सविस्तर चर्चा केल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, माजी महापौर स्मिता खानापुरे, 
डॉ. मन्मथ भातांब्रे, वीरभद्रप्पा भातांब्रे, बसवराज धाराशिवे , राजा राचट्टे , प्रा. ओमप्रकाश झुरळे, स्मिता ताई खानापुरे, लताताई मुद्दे, पूजा पंचाक्षरी, बाळाजीआप्पा पिंपळे, नितीन मोहनाळे , सचिन हुरदळे, राम स्वामी, बसवंतप्पा भरडे , हामने अप्पा, मन्मथप्पा पंचाक्षरी, शरणाप्पा अंबुलगे, उद्योजक श्रीकांत हिरेमठ यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सविस्तर असे प्रास्तविक सोनू डगवाले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या उपोषणामागचा वास्तव उद्देश्य कथन केला. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणारा हा पुतळा या ठिकाणाहून हटविण्यात येऊ नये या रास्त मागणीसाठी पक्षाभिनिवेश बाजूला सारून लिंगायत समाजातील युवकांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे स्पष्टपणे नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जीवन देसाई, पोलीस प्रशासनाच्या वतीने जितेंद्र जगदाळे यांनी आपली भूमिका विशद केली. कोरणेश्वर आप्पाजी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रशासनाच्या लिखित आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित केले जात असल्याचे सांगितले. प्रशासनाने आपला शब्द नाही पाळला तर हिल उपोषण हे धर्मगुरूंचे राहील आणि ते केवळ लातूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर उभारले जाईल, असा इशारा दिला. 
उपोषणकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना हा पुतळा न हटविण्याबाबतचे लेखी पत्र मिळाल्याने आपण आपले उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याचे सांगितले. या उपोषणाच्या माध्यमातून समस्त लिंगायत बांधवांनी आपल्या एकजुटीचे प्रदर्शनही घडविले . राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लिंगायत समाजाच्या कार्यकर्ते - नेत्यांना मागच्या तीन दशकापासून अधिक काळ समाजोपयोगी कार्य करण्याच्या संधीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना हा एक प्रकारे इशाराच असल्याचे मत डॉ. भातांब्रे यांनी व्यक्त केले. या उपोषणास सहकार्य करणाऱ्या प्रशासन, लिंगायत तसेच इतर बहुजन समाजाचेही त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. झुरळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन हुरदळे यांनी केले. उपोषणाच्या यशस्वीतेसाठी संकेत उटगे , शिवानंद हैबतपूरे , केदार रासुरे , नरेश पेद्दे , सतीश पानगावे , राहुल नारगुंडे , सुनील ताडमाडगे, संतोष कळसे आदिंनी परिश्रम घेतले. 
Previous Post Next Post