Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तीस वर्षाची हुकूमशाही लातूर बाजार समितीचे मतदार मोडीत काढणार

तीस वर्षाची हुकूमशाही लातूर बाजार समितीचे मतदार मोडीत काढणार
- माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर




लातूर दि.06-04-2023
पूर्वी साडेसात वर्षाच्या कालावधीत सभापती असताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी लातूर बाजार समितीच्या माध्यमातून हमाल, मापाडी व शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले. शेतकर्‍यांच्या मुलासाठी 200 विद्यार्थ्यांचे मोफत वसतिगृह, हमाल, मापाडी वर्गांना माथाडी बोर्ड लागू करून बोर्डाच्या खात्यावर 80 ते 100 कोटी रूपये जमा करण्याचे काम केलेले आहे. या माध्यमातून हमाल, मापाडी यांना 15 ते 20 हजार रूपये बोनस लागू करण्याचे कामही केलेले आहे. याबरोबरच हमाल, मापाड्यांना त्यांच्या स्वप्नातील घर उभे करून देण्याचे कामही गौरीशंकर गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहे. खर्‍या अर्थाने लातूर बाजार समिती ही मुंबई-पुण्यानंतर राज्यात तिसर्‍या क्रमांवर आणण्याचे काम कव्हेकर साहेबांनी केलेले आहे. त्यानंतर मात्र मुठभर मातीही टाकण्याचे काम गेल्या तीस वर्षात सत्ताधार्‍यांनी केलेले नाही. त्यामुळे सत्ताधार्‍यांची ही तीस वर्षाची हूकुमशाही बाजार समितीचे मतदार मोडीत काढून जिल्हा परिषद, महानगरपालिकेनंतर लातूर बाजार समितीवर भगवा फडकविण्याचे काम करू प्रतिपादन राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
यावेळी ते लातूर बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर मार्केट यार्डातील भाजपा संपर्क कार्यालयाच्या शुभारंभप्रंसगी बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, माजी नगरसेवक अजय दुडीले, माजी सरचिटणीस अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, बाबासाहेब कोरे, दिनकर पाटील मसलगेकर, निळकंठराव पवार, प्रदीप सोलंकी, भालचंद्र दानाई, हेमंत पाटील, चंद्रवर्धन खंदाडे, प्रविण सावंत, शिरीष कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर चेवले, महादेव गायकवाड, बाबासाहेब देशमुख, सिदाजी माने, तानाजी झुंजे, नरसिंग इंगळे, धनंजय बाचपल्‍ले, सूर्यकांराव शेळके, राजाभाऊ वैद्य, सुभद्राबाई पाटील, नेताजी लोमटे,बब्रूवान पवार, अंगद जाधव, अरूण लांडगे, नितीन कोरे, संतोष जाधव, युवराज विर, महादेव आरगडे, नागेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेेकर म्हणाले की, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी हमाल मापाडींना माथाडी बोर्ड लागू करून त्यांच्या खात्यावर जमा केलेल्या शंभर कोटी पैकी सत्ताधार्‍यांनी फक्‍त पाच कोटी रूपयेे नकाशे काढण्यासाठी खर्च केले. परंतु माथाडी कामगारांच्या विकासासाठी मात्र एक रूपयाही खर्च केलेला नाही. या खर्चासाठी एक मॅनेजरही नेमला परंतु त्यानेही हमाल मापाड्यांचे हीत साधण्याचे काम केलेले नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी लातूर मार्केट कमिटी टिकणे गरजेचे आहे. मार्केट कमिटी टिकली तर शहर टिकेल यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, गाडीवान परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभे रहा असे आवाहनही आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौरीशंकर मंदिरामध्ये माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. तसेच हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात दर्शन घेऊन व भाजपा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी परिवर्तन पॅनलच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार संयोजन समितीच्यातवीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अजय दुडील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दूल गालीब शेख यांनी केले तर आभार बाबासाहेब कोरे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रताप शिंदे, उध्दव जाधव, संभाजीराव पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कव्हेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी लातूर बाजार समिती ताब्यात घेण्याच काम करू
भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी सभापती असताना लातूर बाजार समितीचा चौफेर विकास केला. त्यानंतर मुठभर माती टाकण्याचे कामही सत्ताधार्‍यांनी तीस वर्षात केलेले नाही. आज हनुमान जन्मोत्सव म्हणजे परिवर्तनाचा दिवस आहे. त्यामुळे लातूर बाजार समितीला पूर्वीचे गतवैभव प्राप्‍त करून देण्यासाठी व माजी शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या स्वप्नपुर्तीसाठी शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, गाडीवान परिवर्तन पॅनलच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहा असे आवाहन भाजपा नेते तथा राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
शासनाच्या विविध योजनेतून शेतकरी व माथाडी
कामगारांच्या जिवनात क्रांती आणण्याचे काम करू
                                                  - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हमाल मापाड-ी व शेतकरी बांधवांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. साडेसात वर्ष सभापती पदाच्या कालावधीत साडेचारहजार हमाल मापाड्यांना गौरीशंकर गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घर देण्याचे काम केलेले आहे. तसेच मार्केट यार्डातील महत्त्वाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून शहरातील अंजली नगर भागात नवीन वस्ती उभारण्याचे काम केलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हमाल मापाडीसह कामगारांसाठी अनेक योजना आणलेलया आहेत. तसेच शेतकर्‍यांसाठी 42 योजना आणलेल्या आहेत. तसेच प्रत्येक गोष्टीला सबसीडी देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केलेले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून हमाल मापाडी व शेतकरी व कामगारांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्याचे काम करू तसेच लातूर बाजार समितीला गतवैभव प्राप्‍त करून देण्यासाठी देशमुखांच्या उमेदवारांना मातीत गाढण्याचे काम करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोचा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
मार्केट कमिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांच्या मनातील उमेदवारांना साथ द्या
- गुरूनाथ मगे
राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे जिल्हापरिषद, महानगरपालिकेवर भगवा भडकविण्यात यश मिळालेले आहे. आता लातूर बाजार समितीसाठीही आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांनी पुढाकार घेतलेला आहे. पक्षाच्यावतीने सर्वांच्या मनातील उमेदवार निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत भाजी मार्केट आहे त्याच जागेत ठेवण्यासाठी भाजपाला यश मिळालेले आहे. तसेच आडत असोसिएशनच्या कार्यकारीणीतही महत्त्वाचे सदस्य आलेले आहेत. त्यामुळे लातूर मार्केट कमिटीवरही भगवा फडकविण्यासाठी व मार्केट कमिटीच्या राज्यातील नावलौकिकाच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांच्या मनातील उमेदवारांना साथ द्या असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केले.
Previous Post Next Post