२५० पोलिसांची आरोग्य तपासणी
लातूर, दि.७- जागतिक आरोग्यदिनानिमित्त येथील डॉ. नागुरे क्लिनिकच्यावतीने २५० पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय, शिवाजी नगर पोलीस ठाणे व गांधी चौक पोलीस ठाण्यांमध्ये एकाचवेळी हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब व दंत रोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. डॉ. प्रदीप नागुरे, डॉ. स्नेहा बिरादार नागुरे यांच्यासह विश्वजित गव्हाणे, अमर गायकवाड, नागेश तत्तापुरे, योगेश स्वामी, कासीम पटेल, एजाज शेख, अनिल तडमे, प्रसाद पार्सेवार, यशवंत घवले, ज्ञानेश्वर हंगर्गे, मोहसीन सय्यद, सिध्देश्वर पाटील, श्रीकांत चव्हाण, प्रमोद लोकरे, समीर पटेल यांनी तपासण्या केल्या.