Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आईसह दोन मुले बनशेळकी तलावात बुडाली,महिलेचा मृतदेह सापडला,दोन मुलांचा शोध सुरू


गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आईसह दोन मुले बनशेळकी तलावात बुडाली,महिलेचा मृतदेह सापडला,दोन मुलांचा शोध सुरू

बाबूराव बोरोळे
उदगीर/शिरूर अनंतपाळ
तालुका प्रतिनिधी

उदगीर जवळील बनशेळकी तलावात आईसह दोन मुले बुडाल्याची घटना 4 एप्रिल रोजी घडली आहे, बनशेळकी तलावात काही जण बुडाल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यानुसार उदगीर ग्रामीण पोलीस पथकांनी घटनास्थळी भेट देऊन मनीषा गौतम शिरसाठ या महिलेचा मृतदेह तालावबाहेर काढला,तलावाच्या काठावर एका महिलेची चप्पल, आधारकार्ड, पुरुषांचे बूट,तिच्या नऊ वर्षे वयाच्या मुलांसह तीन वर्षीय मुलींचे आधार कार्ड आढळले या आधारे उर्वरित दोघांच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांच्या मदतीने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले परंतू दोन मुलांचा शोध आणखीन लागलेला नाही, पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता मनीषाच्या पतीचे निधन झाल्याने मानसिकता ठीक नसल्यासारखी वागत होती,आधार कार्ड काढण्याचे कारण सांगून ती मुलांना घेऊन घराबाहेर पडली असे सांगण्यात आले, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दोन मुलांचा आणखीन शोध लागला नसल्याची माहिती बिट जमादार शिवप्रताप रंगवाळ यांनी 5 एप्रिल रोजी मोबाईल वरून बोलताना दिली आहे
Previous Post Next Post