Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

परळीत एसटी चालक-वाहकामुळे महिलेचा जीव वाचला

परळीत एसटी चालक-वाहकामुळे महिलेचा जीव वाचला
लातूर आगाराचे चालक कावळे व वाहक पवार यांनी महिलेचे प्राण वाचवले. दोघांचेही कौतुक होत आहे

परळी / प्रतिनिधी


परळीमध्ये एसटी चालक-वाहताच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. परभणीहून-लातूरकडे निघालेली बस बीडच्या परळी बसस्थानकात आल्यानंतर वयोवृद्ध महिला बसच्या सीटवरच बेशुद्ध पडली. प्रवासी व वाहकाने हलवून उठवले तरी महिला उठत नसल्याने बसमधील इतर 40 प्रवाशांना तातडीने खाली उतरवून बस थेट परळी उपजिल्हा रुग्णालयात आणत महिलेवर उपचार सुरू केले. लातूर आगाराचे चालक कावळे व वाहक पवार यांनी धाडस दाखवल्याने आज एका महिलेचे प्राण वाचले. या घटनेनंतर दोघांचेही कौतुक होत आहे.

काय आहे प्रकरण?

लातूर आगाराची बस (एमएच 24 एयू 7768) लातूर डेपोचे चालक अनिल कावळे व वाहक मनोज पवार हे रविवार 23 एप्रिल रोजी परभणीहून सकाळी 9.30 वाजता लातूरकडे निघाली होती. या बसमध्ये परभणीहून एक 60 वर्षीय महिला परळीपर्यंत येण्यासाठी बसली. ही बस परळी बसस्थानकात आल्यानंतर महिला उतरण्याऐवजी जागेवरच बेशुद्ध पडली. शेजारील प्रवासी व वाहकांनी या महिलेस उतरण्यासाठी उठवले. परंतु, महिला बेशुद्ध असल्याने चालक, वाहकांनी बसमधील इतर 40 प्रवाशांना खाली उतरवत लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले व बस थेट परळी उपजिल्हा रुग्णालयात आणत महिलेवर उपचार सुरू केले.
Previous Post Next Post