'सर्किट' चित्रपटाला पुणेकरांची पसंती
पुणे( प्रतिनिधी)- मधुर भांडारकर आणि पराग मेहता यांनी निर्मिती केलेल्या 'सर्किट' या मराठी चित्रपटाचा खास शो पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आला होता .यावेळी अनेक कलावंत मान्यवर पुणेकरांनी हजरी लावली होती. तसेच या चित्रपटाला पुणेकरांनी पसंती दिली आहे .
भालजी पेंढारकर यांचे पणतू आकाश पेंढारकर दिग्दर्शित या चित्रपटाला अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिलेले आहे. तसेच वैभव तत्ववादी ,ऋता दुर्गुळे, रमेश परदेशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत .महेश मांजरेकर दिग्दर्शित ' कुटुंब' , अंकुश चौधरी निर्मित 'झकास' , आदींसह 'टार्गेट ' , 'मॅटर ' , 'डिस्को सन्या' यासह अनेक चित्रपटांना अभिजीत कवठाळकर यांनी संगीतबद्ध केलेले आहे . 'सर्किट ' या चित्रपटात सोनू निगम ,-अवधूत गुप्ते , बेला शेंडे या आघाडीच्यागायक, गायीकांनी गाणी गायलेली आहेत . तसेच मराठवाड्यातील उदयोन्मुख गायिका मधुवंती बोरगावकर हिने पार्श्वगायनात पाऊल टाकलेले आहे. तिने या चित्रपटात दोन गाणी गायलेली आहेत. सोनू निगम यांनी गायलेले 'काहीसा बावरतो … ' व अवधूत गुप्ते यांनी गायलेले ' वाजवायची संनकन..' ही दोन गाणे सध्या सोशल मीडियावर खूपच हिट ठरलेली आहे. - पुणे येथील कोथरूड भागातील सिटी प्राईड येथे गुरुवारी सायंकाळी 'सर्किट ' या चित्रपटाचा खास शो निमंत्रीसाठी आयोजित करण्यात आला होता. या शोला पुणेकरांनी गर्दी केली होती . या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केलेले वैभव तत्ववादी, ऋता दुर्गुळे , रमेश परदेशी यांच्यासह अभिनेता सिद्धार्थ जाधव तसेच मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर , गायिका मधुवंती बोरगावकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी या शोला हजेरी लावली होती. यावेळी सिने रसिकांनी सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यासाठी एकच झुंबड केली होती. सिद्धार्थ जाधव, मंगेश बोरगावकर यांच्यासह अनेकांनी या चित्रपटाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.