Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आयएमए लातूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

आयएमए लातूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार  
 अध्यक्ष डॉ. अनिल राठी , सचिव डॉ. आशिष चेपुरे तर कोषाध्यक्षपदी डॉ. अर्जुन मंदाडे 


लातूर : इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए लातूरच्या वर्ष २०२३ - २४ च्या नूतन पदाधिकाऱ्यांनी हॉटेल कार्निव्हल रिसॉर्ट येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात पदभार स्वीकारला. अध्यक्ष डॉ. अनिल राठी , सचिव डॉ. आशिष चेपुरे तर कोषाध्यक्ष म्हणून डॉ. अर्जुन मंदाडे यांनी पदभार स्वीकारला. आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा म्हणून डॉ. प्रिती बादाडे यांनी तर सचिव म्हणून डॉ. प्रियंका राठोड या काम पाहणार आहेत. 
               या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दल लातूरचे उपमहानिरीक्षक संजीवकुमार, आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे , उपाध्यक्ष डॉ. रमेश भराटे, आयएमए लातूरचे मावळते अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. सौ. सुरेखा काळे यांची उपस्थिती होती.  
 आयएमए लातूरची वर्ष २०२३ -२४ साठीची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे- प्रेसिडेंट इलेक्ट : डॉ. उमेश कानडे, उपाध्यक्ष : डॉ.अशोक पोद्दार, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. राजेश दरडे , डॉ. जितेन जयस्वाल , डॉ. सौ. अनुजा कुलकर्णी, सहसचिव : डॉ.अमोल लोंढे, डॉ. घनश्याम दरक, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. सौ. राखी सारडा, डॉ.सौ. श्वेता काटकर, एचबीआय प्रेसिडेंट : डॉ.दीपक गुगळे, सचिव : डॉ. रवी इरपतगिरे , आयएमए एएमएस प्रेसिडेंट : डॉ. विश्रांत भारती , सचिव : डॉ. मेहुल राठोड, आयएमए एमपीएच प्रेसिडेंट : डॉ.सौ. वृंदा कुलकर्णी, सचिव : डॉ.सौ. रचना जाजू, आयएमए सीजीपी प्रेसिडेंट : डॉ. सलगर, सचिव : डॉ. पटणे , राज्य प्रतिनिधी : डॉ.अभय कदम, डॉ. अजय जाधव, डॉ.अमीर शेख, डॉ.सौ. शुभांगी राऊत, केंद्रीय प्रतिनिधी : डॉ.संदीप कवठाळे ,डॉ. ओमप्रकाश भांगडिया, डॉ. उदय मोहिते, डॉ.संजय वारद , अकॅडमिक को- ओर्डीनेटर्स : डॉ.श्याम सोमाणी, डॉ. महेश उन्नी , डॉ. चेतन सारडा, डॉ .सचिन इंगळे, डॉ.अजय पुनपाळे, डॉ.संजय शिवपुजे, स्पोर्ट्स को- ओर्डीनेटर्स : डॉ.सौ. आरती झंवर, डॉ.सौ. ज्योती सूळ, डॉ.सौ. कल्पना किनीकर , डॉ.चांद पटेल, डॉ.चेतन जाजू, डॉ.अयाज शेख, डॉ.अशोक डाके, सांस्कृतिक को- ओर्डीनेटर्स : डॉ. मिलिंद पोतदार, डॉ.सौ. ऋतुजा अयाचित, डॉ.सौ. कांचन जाधव, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ.अमित उटीकर , कार्यकारी सदस्य : डॉ.सुरेश भट्टड, डॉ. डी.एन. चिंते, डॉ. उदय देशपांडे, डॉ.सुबोध सोमाणी, डॉ. रमेश भराटे , डॉ. हनमंत किनीकर , मार्गदर्शक : डॉ. एस. एन. जटाळ , डॉ. हंसराज बाहेती, डॉ. राम पाटील, डॉ. सौ. सरिता मंत्री, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. एन. पी. जामदार , डॉ. राजेश पाटील, डॉ. गिरीश मैंदरकर. 
आयएमएचे नूतन अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी यावेळी बोलताना पुढील वर्षभरात आय एम ए च्या सदस्य डॉक्टरांसाठी अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. आयएमएचे सदस्य डॉक्टर व रुग्णालय यांच्या समस्या सोडविण्यासाठी आयएमए सदैव आपल्या सदस्यांच्या पाठीशी राहील याची ग्वाही दिली. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील नाते अजून दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना संजीव कुमार यांनी कोविड काळात डॉक्टरांनी केलेल्या सेवेचे कौतुक करून डॉक्टरांना समाजाकडून सन्मान मिळाला पाहिजे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून रुग्णसेवा अधिक चांगली मिळण्यास मदत होईल असे ते म्हणाले. कोविडच्या दोन्ही लाटेत सीआरपीएफच्या जवानांसाठी डॉक्टरांनी केलेल्या उपचाराबद्दल त्यांनी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचे आभार मानले. डॉ. रवींद्र कुटे यांना नवीन कार्यकारणी सदस्यांना शुभेच्छा दिल्या व आयएमए महाराष्ट्र कडून त्यांना पूर्ण पाठिंबा राहील व विविध उपक्रम राबवण्यात आयएमए लातूरची मदत करू असे त्यांनी सांगितले. त्यांनी आयएमए लातूरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून आपण आतापर्यंत राज्याचा अध्यक्ष या नात्याने २०१ आयएमए शाखांना भेटी दिल्या आहेत. मात्र लातूरसारखे आगळेवेगळे नियोजन अन्य कुठेही पाहायला मिळाले नसल्याचे नमूद केले. याप्रसंगी डॉ. रमेश मराठे डॉ. शुभांगी राऊत डॉ. कल्याण बरमदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. आशिष चेपुरे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. सौ. ऋतुजा अयाचित व डॉ. चांद पटेल यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे यांनी केले. 
याप्रसंगी लातूरचे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सोपान जटाळ, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. भातांब्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, निर्वाचित अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, उपाध्यक्ष डॉ. राजेश दरडे, डॉ. अजय जाधव, डॉ. अशोक गानू, डॉ. संजय वारद, डॉ. दीपक गुगळे, डॉ. अर्चना कापसे, डॉ. अजय ओव्हाळ, डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. दत्तात्रय मंदाडे, डॉ. चेतन सारडा, डॉ. आमिर शेख, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. तापडिया, डॉ. राखी सारडा, डॉ. अपूर्वा चेपुरे, डॉ. श्वेता काटकर, डॉ. शारदा इरपतगिरे, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. संदीकर, डॉ. देशमुख, डॉ. धूत, व इतर मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Previous Post Next Post