Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड

रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड 


लातूर ; दि. १० (प्रतिनिधी ) -येथील फॅशन डिझायनर रूपाली अजय बोराडे - पाटील यांना नुकताच 'बेस्ट डिझायनर अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .  
  
            लातूरमध्ये पहिल्यांदाच सूर्या नेत्रा फाउंडेशनचा ब्युटी एक्सपो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये सूर्या सरांच्या मॉडेलसाठी रूपाली पाटील यांनी ड्रेस डिझाईन केला होता. तो ड्रेस १०० मीटर असून 2018 मधील कान्स फेस्टिवल मधील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी परिधान केला होता .या ड्रेस सारखाच हुबेहूब ड्रेस इतरांच्या मदतीने रूपाली पाटील यांनी अवघ्या दोन दिवसात तयार केला होता .या ड्रेसचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      याबद्दल नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात रूपाली पाटील यांना सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह घेऊन सन्मान करण्यात आला.रूपाली अजय बोराडे- पाटील या लातूरातील सुप्रसिद्ध ड्रेस डिझायनर असून त्यांनी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे ड्रेस तयार करून दिलेले आहेत. महाराष्ट्रातून आतापर्यंत शंभर मीटर इतका लांबीचा ड्रेस कोणीही बनविलेला नव्हता , ती किमया रूपाली पाटील यांनी केलेली असल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .त्यांना आतापर्यंत सोलापूर व इतर ठिकाणाहून फॅशन शो मध्ये ड्रेस बनवण्याच्या मागण्या येत आहेत. 
       त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल रूपाली पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून आपल्यासाठी ही एक सन्मानाचीच बाब असल्याचे त्या म्हणाल्या. अशी संधी मिळणे ही खूपच अवघड असते त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊन हा सन्मान मिळवला असल्याचे त्या म्हणाल्या.
Previous Post Next Post