Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड येथील अधिवेशनास लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड येथील अधिवेशनास लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे 
.....................................
 मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया व संजय मालानी यांचे आवाहन







लातूर : 'लढा पत्रकार आणि पत्रकारितेसाठीचा' या उद्देशाने स्थापन झालेल्या आणि अल्पावधीतच महाराष्ट्र सह देशातील २८ राज्यांमध्ये २८ हजार ५०० सदस्य झालेल्या व्हॉईस ऑफ मीडियाचे पहिले विभागीय अधिवेशन बीड येथे येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. या या अधिवेशनास लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया व प्रदेश उपाध्यक्ष संजय मालानी यांनी केले.
विभागीय अधिवेशनाच्या अनुषंगाने व्हॉईस ऑफ मीडिया लातूर जिल्हा शाखेची आढावा बैठक रविवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी यावेळी बीड जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर धांडे, अमोल जाधव, परभणीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत प्रारंभी व्हॉईस ऑफ मीडिया टेलिव्हिजन विभागाच्या प्रदेश संघटकपदी निवड झाल्याबद्दल दीपरत्न निलंगेकर, साप्ताहिक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल वामन पाठक व साप्ताहिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले विष्णू अष्टेकर आणि डिजिटल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले डॉ. सितम सोनवणे यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बालाजी फड यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा सादर केला. विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया व संजय मालानी म्हणाले की, बीड येथील संघटनेचे पहिले अधिवेशन नुसते बीड पुरते मर्यादित नसून ते मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचे ब प्रत्येक पत्रकाराचे आहे. या संघटनेची बांधणी मुळात पत्रकारांच्या प्रश्नांना घेऊन केलेली आहे. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या पत्रकारांचे हक्काचे घर असावे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे अर्धवट राहू नये, डिजिटल विभागला पत्रकार प्रशिक्षित असावा व वयाच्या साठ वर्षानंतर पत्रकाराला पेन्शन मिळावी या प्रमुख पाच मुद्द्यांवर संघटना राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी व सरकारला भाग पाडण्यासाठी पत्रकारांचे संघटन महत्त्वाचे आहे. त्यासाठीच व्हाईस ऑफ मीडिया संघटना पुढे आली असून या संघटनेच्या कार्याला प्रमाण मानत पत्रकारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे संघटन विभागासह राज्य व राष्ट्रीय स्तरावर सरकारला दिसले पाहिजे म्हणून अधिवेशनाची आवश्यकता असते. अधिवेशनाच्या माध्यमातूनच सरकारकडे आपल्या प्रश्नांना वाचा फोडता येते. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी बीड येथे होणाऱ्या विभागीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर यांनी वर्चुअलद्वारे बैठकीस मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी दीपरत्न निलंगेकर, वामन पाठक, डॉ. सितम सोनवणे, प्रभाकर शिरुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार यांनी आभार मानले. या बैठकीस जिल्हा सरचिटणीस संगम कोटलवार जिल्हा कार्याध्यक्ष सुशांत सांगवे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चव्हाण, बाळासाहेब जाधव, श्रीराम जाधव, काकासाहेब घुटे, रेणापुरचे तालुकाध्यक्ष विठ्ठल कटके, सचिव बालाजी कटके, कार्याध्यक्ष रफिक शिकलकर, निलंगा तालुकाध्यक्ष परमेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष तुकाराम सूर्यवंशी, चाकूर तालुकाध्यक्ष विनोद निला, कार्याध्यक्ष प्रशांत शेटे, सरचिटणीस संग्राम वाघमारे आदी उपस्थित होते.
.....................................
Previous Post Next Post